मौजे ताडवळे
मौजे तडवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव माढा मोहोळ आणि बार्शी या तीन तालुक्याच्या सीमेवर, भोगावती नदीकाठी वसलेले आहे.
?मौजे तडवळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | बार्शी |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | सुमन मारूती आवारे |
बोलीभाषा मराठी | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/13 |
भौगोलिक स्थान
संपादनमोहळ, माढा, या तालुक्याच्या सीमेवरील गाव आहे
हवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनतडवळे गावातील श्री भगवती देवीचे मंदिर आहे. तसेच भोगावती नदी आहे. यशवंतराव चव्हाण प्रशाला आहे. वैराग पासून १३ कि.मी वर माढा रोडवर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदिर आहे. हे मंदिर भव्य असुन या देवीची अशी कथा सांगितली जाते की या देवीची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्यावेळी तळहाताएवढया आकाराची होती व सध्या ही मुर्ती 5 ते साडे पाच फुट एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्या देवीप्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्या देवीप्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पूर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता ही जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकऱ्यांची खुप श्रध्दा आहे. भगवती मातेची मिरवणुक ही भव्या असते. गावच्या यात्रेस परगावचे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन, यावली व ढोराळे गावानजीक आहे.
नागरी सुविधा
संपादनप्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ग्रामपंचायत कार्यालय आहे. यशवंतराव चव्हाण प्रशाला जि.प.प्रा.शाळा तडवळे जि.प.प्रा.शाळा गायकवाड वस्ती तडवळे ही शैक्षणिक केंद्रे आहेत.
जवळपासची गावे
संपादनढोराळे, यावली, दिहिटणे,