मोस्कवा नदी

रशियामधील नदी

मोस्कवा (रशियन: река Москва) ही पश्चिम रशियामधील एक लहान नदी आहे. ओका नदीची एक उपनदी असणारी मोस्कवा मॉस्को शहराच्या सुमारे १४० किमी पश्चिमेस उगम पावते, रशियाच्या स्मोलेन्स्कमॉस्को ओब्लास्त ह्या विभागांमधून वाहते व कोलोम्ना शहरामध्ये ओका नदीला मिळते.

मोस्कवा नदी
река Москва
मॉस्को शहरामधील मोस्कवाचे पात्र
मोस्कवा नदीच्या मार्गाचा नकाशा
मुख ओका नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
लांबी ५०३ किमी (३१३ मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १७,६००
भारत व रशियाने एकत्रितपणे विकसित केल्या गेलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे नाव ब्रह्मपुत्रा व मोस्कवा नद्यांवरून ठेवण्यात आले आहे.

१९३७ साली बांधण्यात आलेल्या मॉस्को कालव्याद्वारे मोस्कवा वोल्गा नदीसोबत जोडण्यात आली आहे.

बाह्य दुवे

संपादन