मोरघार
मोरघार, धुंडूरा, शेंडूर्ली, मोर बाज किंवा हूम बाज (इंग्लिश:Indian Crested Hawk-Eagle; हिंदी:कलगीदार गरुड, शाहबाज; संस्कृत:भारत चुडाल श्येनक, वाजराज, शशादश्येन, सुपर्ण; गुजराती:मोरबाज) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
संपादनघारीपेक्षा मोठा,जंगलात राहणारा गरुड.त्यात विविध रंगपालट दिसून येतात.त्यामुळे ओळखायला कठीण.वरून उदी,खालून पांढरा.गळ्यावर लांबट काळ्या काड्या.छातीवर कथया रंगाच्या रेघोट्या.डोक्यावर लांब निमुळता तुरा.उडताना पंखाचे टोक गोलसर दिसते.लांबट शेपटी.पांढरे अंग.त्यावर उदी रंगाचे ठिपके.पंखाखालचा रंग करडा.त्यावर काड्या व ठिपके.त्यामुळे त्याला उडताना सहज ओळखता येते.नर-मादी दिसायला सारखे.मादी आकाराने मोठी.जंगलात एकटा आढळून येतो.
वितरण
संपादनभारत द्वीपकल्प, माऊंट अबू, इटावा, शेरघाटी, कोलकाता आणि श्रीलंका.
निवासस्थाने
संपादनपानगळीची आणि सदाहरितपर्णी जंगले.