मोनिरा रहमान
मोनिरा रहमान बांगलादेशी मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत . त्यांचा जन्म १९६५ मध्ये जेसोर, पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश ) येथे झाला. त्यांच्या चळवळीमुळे, बांगलादेशातील महिलांवर ॲसिड आणि पेट्रोल हल्ले ४० पटीने कमी झाले आहेत. त्यांनी कायदे बदलले आहेत. त्यांनी दुर्गम भागातही त्वरित, सक्षम मदतीची खात्री तयार केली आहे आणि मॉडेल मानसशास्त्रीय आणि इतर पाठपुरावा सेवा तयार केल्या आहेत. [१] स.न. २००६ साली मोनिरांनी त्यांच्या धाडसी सक्रियतेसाठी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ह्युमन राइट्स डिफेंडर पुरस्कार जिंकला. त्यांनी ॲसिड सर्व्हायव्हर्स फाउंडेशन (एएसएफ)चे संस्थापक डॉ जॉन मॉरिसन सोबत काम केले आणि त्यानंतर २००२ ते २०१३ पर्यंत कार्यकारी संचालक म्हणून काम केले. स.न. २०११ मध्ये वर्ल्डस् चिल्ड्रनस् बक्षीसाने त्यांना स्न्मानित करण्यात आले. [२] मोनिरा यांना २०१२ मध्ये राष्ट्रकुल व्यावसायिक फेलो आणि २०१३ मध्ये अशोक फेलो देण्यात आले [३]
मोनिरा रहमान | |
---|---|
जन्म | जेसोर, पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश ) |
प्रसिद्ध कामे | बांगलादेशात महिलेवर ॲसिड आणि पेट्रोल हल्ल्यात घट |
प्रारंभिक जीवन
संपादनमोनिरा तिच्या सहा भावंडांमध्ये सर्वात लहान होती. बांगलादेश मुक्ती युद्ध (१९७१) दरम्यान, तिच्या कुटुंबाला पळून जावे लागले आणि तिचे वडील मरण पावले. नंतर तिच्या आईने सहा मुलांना वाढवले. या विध्वंसक अनुभवाने मोनिरावर खोल छाप सोडली आणि तिला खूप स्वतंत्र होण्यास उद्युक्त केले. [१] लहानपणापासूनच मोनिरा वादविवाद आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गुंतली होती ज्यामुळे तिच्यात नेतृत्व विकसित झाले आणि तिला प्रश्न विचारायला शिकवले. तिच्या विद्यापीठ जीवनात बांगलादेशच्या ढाका विद्यापीठातील शमसुन्नहार हॉलच्या उपाध्यक्षपदी तीची निवड झाली. पदवीनंतर तिच्या कुटुंबाने तिला सरकारी नोकरी मिळवण्यास भाग पाडले पण त्याऐवजी ती कन्सर्न वर्ल्डवाइडमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामील झाली. [१]
शिक्षण
संपादनमोनिराने तिची एसएससी स.न. १९८१ मध्ये कुमारुन्नेसा गर्ल्स स्कूलमधून पूर्ण केली. स.न. २९८३ मध्ये ईडन गर्ल्स कॉलेजमधून एचएससी पूर्ण केली. त्यानंतर, ती ढाका विद्यापीठात गेली आणि बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) आणि तत्त्वज्ञानातील मास्टर ऑफ आर्ट्स अनुक्रमे १९८७ आणि १९८८ मध्ये पूर्ण केले.
कारकीर्द
संपादनमोनिरा यांनी १९९२ मध्ये कन्सर्न वर्ल्डवाइड मध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपले कार्य सुरू केले आणि १९९९ पर्यंत तेथे काम केले. तेथे त्यांनी व्यावसायिक लैंगिक कामगार, रस्त्यावरील मुले आणि बेघर - विशेषतः रस्त्यावर राहणाऱ्या मानसिकदृष्ट्या आजारी महिलांसाठीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी काम केले. रस्त्यावर राहणाऱ्या मानसिकदृष्ट्या आजारी महिलांना सहसा वॅगरन्सी ॲक्ट १९४३ अंतर्गत अटक केली जात होती. मोनिरा यांच्या कार्यामुळे सरकारला वॅगरन्सी कायदा तसेच अल्पवयीन न्यायव्यवस्थेचा आढावा घ्यावा लागला आणि मंत्रालयाला दक्षता पथक विकसित करण्यासाठी औपचारिक करार करावा लागला. [१] त्या काळात देशभरात महिलांवर ॲसिड हल्ल्यांचे प्रमाण आणि त्याच्या तीव्रतेने त्यांना धक्का बसला. त्यांनी नारी पोखो या महिला हक्क संघटनेसाठी काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर १९९८ मध्ये ॲसिड सर्व्हायव्हर्स फाउंडेशनमध्ये सामील झाल्या. तिथे त्या २००२ पासून ती कार्यकारी संचालक आहेत. [४] त्या सध्या मेंटल हेल्थ फर्स्ट एड बांगलादेश मध्ये कंट्री लीड आणि वेलबीइंग बांगलादेश साठी इनोव्हेशनच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करीत आहेत. त्या संस्थेच्या त्या संस्थापक देखील आहेत. [३]
सन्मान आणि पुरस्कार
संपादन- मानवाधिकार रक्षक (मार्च २००६) - ॲम्नेस्टी इंटरनॅशनल
- महिलांसाठी आरोग्य आणि सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार (ऑक्टोबर २००९) - अमेरिकन यु एन एफ पी ए साठी
- जागतिक बाल पुरस्कार सन्मान पुरस्कार (एप्रिल २०११) - वर्ल्ड चिल्ड्रन्स प्राइज फाउंडेशन, स्वीडन
- राष्ट्रकुल व्यावसायिक फेलो (ऑक्टोबर २०१२) - राष्ट्रकुल शिष्यवृत्ती आयोग (सी. एस. सी.)
- अशोक फेलोशिप (फेब्रुवारी २०१५) - अशोक, जनतेसाठी नवकल्पनाकार
संदर्भ
संपादन- ^ a b c d "Monira Rahman". Ashoka | Everyone a Changemaker (इंग्रजी भाषेत). 2019-06-08 रोजी पाहिले.
- ^ "Monira Rahman - World's Children's Prize". worldschildrensprize.org. 2019-06-08 रोजी पाहिले.
- ^ a b "Monira Rahman". Linkedin.
- ^ "Fighting acid attacks in Bangladesh – Monira Rahman and the "Acid Survivors Foundation" | Berliner Menschenwürde Forum". www.human-dignity-forum.org. 2019-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-08 रोजी पाहिले.