मोतीराम कटारे ( १ जून १९५५) हे महाराष्ट्रातील समीक्षक आणि कवी आहेत. साहित्य क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ते समकालीन समर्थक आहेत.[]

व्यक्तिगत जीवन

संपादन

कटारे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बहादुरी येथे झाला. परंतु मूळ गाव शिंगवे (ता. निफाड, जि: नाशिक.) हे होते. त्यांचे ७ वी पर्यंतचे शिक्षण गावात झाल्यावर पुढील शिक्षणासाठी काका कल्याणला घेऊन आले. न्यू हायस्कुल, कल्याण येथे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण व पुढे आर.के. तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर येथे बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात दलित पॅंथर या चळवळीच्या नेत्यांच्या संपर्कात आले. "ठिणगी" या अनियतकालिकातून पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर ते प्रा. रा.ग. जाधव तसेच दलित साहित्याची चळवळ सुरू करणाऱ्या आप्पासाहेब रणपिसे यांच्या संपर्कात आले. दलित कवितेतील हिंदुत्व या ग्रंथाने त्यांना समीक्षक म्हणून मान्यता दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तालयातील नोकरी सांभाळत त्यांनी आपले लेखन केले. या सेवेतून ते सन २०१३ साली निवृत्त झाले. आता पूर्ण वेळ लेखन करतात.

 लेखन 

संपादन

कवितेसोबतच वैचारिक लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या वैचारिक लेखांचे पुस्तक सर्वप्रथम "व्यक्ती आणि विचार प्रबोध" हा ग्रंथ प्रचार प्रकाशन कोल्हापूर या  प्रकाशकाने १९९५ मध्ये प्रसिद्ध  केला. अस्मितादर्श नियतकालिकाने पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. दरम्यान त्यांनी मराठी साहित्य समीक्षा आणि दलित साहित्याची समीक्षा अभ्यासली आणि त्यातून "दलित कवितेतील हिंदुत्व " आकाराला आले.हा ग्रंथ सर्वार्थाने गाजला. प्रस्थापित समीक्षकांनी त्यांना शत्रू पक्षात ढकलले. समीक्षकांच्या या प्रवृत्तीने त्यांना समीक्षा लेखनाला बळ मिळाले. डॉ-बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचा विचार समीक्षेच्या केंद्रस्थानी आणला . लेखकाची ग्रंथसंपदा खालील प्रमाणे आहे 

समीक्षा :-

संपादन

१) दलित कवितेतील हिंदुत्व , सुगावा प्रकाशन(१९९७)

२) मूल्यशोध ,स्वरूप प्रकाशन,औरंगाबाद (२०००)

३) फुले - आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य :  नवे कवी नवे आकलन ,प्रतिमा प्रकाशन (२००६)

४) फुले आंबेडकरी-  साहित्य :आकलन आणि आस्वाद  कैलाश पब्लिकेशन ,औरंगाबाद  (२००६)

५) फुले - आंबेडकरी साहित्यः:वाद -संवाद  वाड्मयसेवा  प्रकाशन]नाशिक  (२००८)

६) समकालीन साहित्यवेध ,प्रतिभास प्रकाशन,परभणी(२०१०)

७) देशीवाद :रूप आणि रंग ,गोदा  प्रकाशन ,औरंगाबाद (२०१०)

८) साहित्य  नवे आकलन ,कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद,२०१८

९) साहित्य पर - वाद ,सहित प्रकाशन,गोवा,२०१९

१०) निवडक मराठी कविता आणि कवी , अक्षरवाड्मय प्रकाशन , (२०२२)

वैचारिक 
संपादन

१) व्यक्ती आणि विचार प्रबोध ,प्रचार प्रकाशन,  कोल्हापूर (१९९५)

२) क्रांतिबा फुले : चळवळ आणि तत्त्वज्ञान ,सुगावा प्रकाशन ,पुणे (२०००)

३) संशोधनातील ब्राम्हण्य,आशय  प्रकाशन ,ठाणे  (२००५)

४) आंबेडकरी चळवळ : बदलते  संदर्भ ,कौशल्य प्रकाशन ,औरंगाबाद  (२००८)

५) बदलते सामाजिक पर्यावरण आणि आंबेडकरी विचार ,गोदा प्रकाशन ,औरंगाबाद  (२००८)

६) धम्म चळवळ :स्थिती आणि गती ,,सुगावा प्रकाशन ,पुणे (२०१२)

७) फुले - आंबेडकरी चळवळ आणि साहित्य चिंतन, गोदा प्रकाशन ,औरंगाबाद  (२००८)

अर्थशास्त्र

१) आंबेकरी अर्थशास्र बुद्ध तिसरा पर्याय

संकीर्ण

तीन मुलाखती

कवितासंग्रह :- 
संपादन

१) दिशांतची पाखरं,विहेतुल प्रकाशन ,मुंबई,(१९९७)

र) शतकांताच्या क्षितिजापार,प्रणेता प्रकाशन, मुंबई (१९९९)

,३) हिरवे ऋतू उतरवून,प्रतिमा प्रकाशन, पुणे  (२००६)

,४) लोकहो तुम्हीच आहात गुन्हेगार, देवयानी  प्रकाशन, नवी मुंबई  (२०११)

संपादने 
संपादन
1) अरुण काळे :व्यक्तीं आणि वाड्मय , कौशल्य प्रकाशन ,औरंगाबाद  (२००८)गो
संपादन
2) चळवळी आणि साहित्य , गोदा प्रकाशन  ,औरंगाबाद  (२०१३)
संपादन

मोतीराम कटारे गौरवग्रंथ : निरुपक

सन्मान  

संपादन

साहित्य संमेलन अध्यक्ष

१) सम्यक साहित्य संसद , सिंधुदुर्ग ,कणकवली आयोजित साहित्य संमेलन : २०००

२) मुंबईत सन २००५ मध्ये आंबेडकरी साहित्य संसदेने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

३) लोकजागृती मंच आणि इतर ,घाटंजी ,यवतमाळ आयोजित पहिले  फुले - आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन ::  मार्च २०१६

4) बोधिसत्व विचार जागर साहित्य संमेलन १४ एप्रिल २०१७ : सावंतवाडी

साहित्य संमेलन उद्घाटक

1) तिसऱ्या जगाचे साहित्य संमेलन ,बुलढाणा :२००५

2) सम्यक साहित्य संसद , सिंधुदुर्ग ,आयोजित  तिसरे फुले -आंबेडकर साहित्य संमेलन, वैभववाडी :२०१७

दुबई येथे २०१० मध्ये  झालेल्या दुसऱ्या  विश्व साहित्य संमेलनातं संत साहित्यावरील परिसंवादासाटी निमंत्रित

महाराष्ट्र टाइम्स नोंद

सूड, अभिसरण ह्या कलाकृती मार्क्सवादी कशा नाहीत , याचे त्यांनी केलेले विवेचन केले . तृतीय रत्न मधील समकालीन वास्तव, सांस्कृतिक मूलतत्त्ववाद हे त्यांचे लेखांचा विशेष परिचय आहे. व्यक्ती आणि विचारप्रबोध, दलित कवितेतील हिंदुत्व, नवे कवी नवे आकलन, देशीवाद : रूप आणि रंग हे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

त्यामुळे कटारे यांनी देशीवाद तसेच आधुनिकतावाद यांची चर्चा करताना या वादांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. दलित साहित्याच्या पांगुळगाड्यावर देशीवाद स्वार ह्या लेखातून देशीवादावर आक्षेप नोंदवले. त्यांच्या देशीवाद : रूप आणि रंग या ग्रंथाला मराठवाडा साहित्य परिषदेने म . भि . चिटणीस पुरस्कार दिला.

संदर्भ

संपादन