मैथिली विकिपीडिया ही विकिपीडियाची मैथिली भाषेतील आवृत्ती आहे. विकिमिडीया फाऊंडेशनद्वारा ही आवृत्ती कार्यान्वित केलेली आहे.[]

मैथिली विकिपीडिया
मैथिली विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा मैथिली
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://mai.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ६ नोव्हेंबर, इ.स. २०१४
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

प्रारंभ

संपादन

६ नोव्हेंबर २०१४ रोजी याचा प्रारंभ झालेला आहे. तिरहुता ही मैथीली भाषा लेखनाची प्राथमिक लिपी आहे.[] कैथी या फारशा माहिती नसलेल्या लिपीतही ही भाषा लिहीली जाते.[] नंतरच्या काळात मैथिली भाषा ही देवनागरी लिपीत लिहीली जाते.

बोलीभाषा म्हणून वापर

संपादन

मैथिली ही बिहार आणि झारखंड भागात बोलली जाणारी इंडो -आर्यन भाषा आहे. २२ प्रमुख भारतीय भाषांमधील एक भाषा म्हणून मैथिलीला मान्यता मिळालेली आहे. ही भाषा नेपाळच्या तराई प्रदेशातही बोलली जाते आणि नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाची प्रचलित भाषा म्हणून तिला मान्यता आहे.

इतिहास

संपादन

मैथिली विकिपीडियाची सुरुवात होण्याची प्रक्रिया २००८ साली सुरू झाली पण तिला २०१४ साली प्रत्यक्ष चालना मिळाली. नोव्हेंबर २०१८ साली या विकिपीडियाची आवृत्ती प्रकाशित होऊन प्रत्यक्ष संपादनाची प्रक्रिया सुरू झाली.[]

सद्यस्थिती

संपादन

या विकिपीडियावर सध्या १३,६१४ विविध लेख उपलब्ध असून ९६६४ वापरकर्त्यांची खाती यावर आहेत. ६ प्रचालक या व्यासपीठाचे काम पाहतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "'Wikipedia' in Maithili language Approved". Glocal Khabar (इंग्रजी भाषेत). 2014-10-16. 2021-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ Yadav, Ramawatar (2011-07-20). A Reference Grammar of Maithili (इंग्रजी भाषेत). Walter de Gruyter. ISBN 978-3-11-081169-8.
  3. ^ Brass, Paul R. (2005). Language, Religion and Politics in North India (इंग्रजी भाषेत). iUniverse. ISBN 978-0-595-34394-2.