मेरीट आरम
मेरीट योहान आरम (२२ एप्रिल, १९०३ - १९५६) ही नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ, उदारमतवादी राजकारणी, नागरी सेवक आणि स्त्रीवादी होती.
मेरीट आरम | |
नॉर्वेजियन असोसिएशन फॉर वुमेन्स राइट्सची १६ वी अध्यक्ष
| |
कार्यकाळ १९५५ – १९५६ | |
मागील | इंगेरिड ग्जोस्टीन रेसि |
---|---|
पुढील | सिग्ने स्वेन्सन |
नॉर्वेजियन संसदेची उपसदस्य
| |
कार्यकाळ १९५४ – १९५६ | |
ओस्लो मध्ये लिबरल पार्टी (नॉर्वे) ची अध्यक्ष
| |
जन्म | २२ एप्रिल, १९०३ |
मृत्यू | १९ फेब्रुवारी, १९५६ (वय ५२) |
राष्ट्रीयत्व | नॉर्वे |
राजकीय पक्ष | लिबरल पार्टी (नॉर्वे) |
व्यवसाय | अर्थशास्त्रज्ञ, उदारमतवादी राजकारणी |
आरमचा जन्म २२ एप्रिल, १९०३[१] रोजी झाला. तिने रॉयल फ्रेडरिक विद्यापीठात शिक्षण घेतले आणि कॅंडीडेटा इकॉनॉमिक्स (उमेदवारी अर्थशास्त्र) पदवी १९२६ मध्ये प्राप्त केली.
कारकीर्द
संपादनआरम ही नॉर्वेजियन लेबर इन्स्पेक्शन अथॉरिटीमध्ये निरीक्षक होती. १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत नॉर्वेजियन सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिने काम केले. तिने १९५२ ते १९५३ मध्ये सहा महिने पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे तज्ञ म्हणून काम केले.[२]
आरम १९५२ मध्ये नॉर्वेजियन असोसिएशन फॉर वुमेन्स राइट्सची उपाध्यक्ष बनली. ऑगस्ट १९५५ मध्ये जेव्हा संस्थेचे अध्यक्ष, इंगेरिड ग्जोस्टीन रेसी याचे विमान अपघातात निधन झाले, तेव्हा मेरिट आरमने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. १९५६ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत[२] ती अध्यक्ष होती.
तिच्या राजकीय कारकिर्दीत, ती लिबरल पार्टीच्या ओस्लो शाखेची अध्यक्ष आणि ओस्लो सिटी कौन्सिलच्या सदस्य होती. १९५४ पासून तिच्या मृत्यूपर्यंत ती लिबरल पार्टीसाठी ओस्लोचे प्रतिनिधित्व करणाऱी नॉर्वेजियन संसदेची उपसदस्य होती.[१]
प्रकाशने
संपादन- ३ डिसेंबर १९४९: मेड कॉमेन्तारर साम्त एन डेल ओम फेरिअलवेन ओग् सिकेट्रिग्लोवेन्, १९४९ साठी मिडलर्टीडिग लव्ह ओम आर्बेइड्सविल्कॅर
संदर्भ
संपादन- ^ a b "Biografi: Aarum, Marit Johanne". Stortinget (नोर्वेजियन भाषेत). 2008-03-09. 2020-12-11 रोजी पाहिले.
- ^ a b "Marit Aarum". Norsk Kvinnesaksforening (नॉर्वेजियन बोकमाल भाषेत). 2016-02-16. 2020-12-11 रोजी पाहिले.