मुतखडा

(मूतखडा या पानावरून पुनर्निर्देशित)

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

मूतखडा

मुतखडा तयार होण्याचा धोका असणारे

संपादन
 • ८०% रुग्ण पुरुष असतात.
 • वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण
 • २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती
 • कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती
 • ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अ‍ॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.
 • गर्भारपणात प्रोजेस्टेरॉन नावाचे स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.
 • गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे तयार होण्याचे प्रमाण वाढते.

मुतखडा तयार होण्याची प्रकिया

संपादन
 • लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
 • पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
 • मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे त्यामुळे नायडस(??) तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.

मुतखड्याचे प्रकार

संपादन
 • कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.
 • रक्तातील व लघवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे मूतखडे तयार होतात.

लक्षणे

संपादन
 
मुतखड्याच्या वेदना कोणत्या भागात होतात, ते दाखविणारे एक चित्र - पीडित भाग काळ्या रंगाने दाखविलेला आहे.
 • सामान्यतः मुतखड्यामुळे लक्षणे दिसुन येत नाहीत परंतु जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात. ह्या वेदना ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
 • लघवीत रक्त गेल्याने लघवी लाल रंगाची होते.
 • मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.
 • यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते.

तपासणीच्या पद्धती

संपादन
 • पोटाची सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते.
 • पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.
 • मूत्रमार्गाची एंडोस्कोपी ही तपासणी केल्यास मुतखड्याबद्दल अधिक तपशील समजून येतात.

मुतखडा होणे टाळण्यासाठी

संपादन

१) पाणी जास्त प्यावे

२) लघवीला शक्यतो रोखू नये

मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर उपाय

संपादन

आयुर्वेदानुसार, मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी,

 • तातडीचा घरघुती उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटात त्यामुळे उद्भवणारी पोटदुखी थांबते.
 • सराटे (काटेगोखरू) याचा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.
 • कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा यावर उत्तम आहे.[१]
 • कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅंॅंम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
 • जर खडा लहान असेल व जास्त जुना नसेलतर मेंदीचे साल बारीक वाटून चूर्ण करावे. हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा (२-३ ग्रॅंॅंम ) पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर निघून जातो.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
 1. ^ वैद्य विनय वेलणकर. ई-पेपर, लोकमत, नागपूर, सखी पुरवणी, पान क्र. ५, भयंकर पोटदुखी Check |दुवा= value (सहाय्य). दि.१५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)