मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे.[]

मुळशी धरण

धरणातील पाणी सिंचनासाठी तसेच टाटा पॉवरद्वारे चालवल्या जाणाऱ्या भिरा जलविद्युत प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वापरले जाते. या केंद्रावर १९२७ मध्ये बसवलेल्या सहा २५ मेगावॅट क्षमतेच्या पेल्टन टर्बाइन आणि १५० मेगावॅट क्षमतेचे एक पंप्ड स्टोरेज युनिट चालवले जाते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात असलेल्या या जलाशयातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी भिरा पॉवर हाऊसमध्ये वळवले जाते. तयार होणारी वीज मुंबई शहराला पुरविली जाते.

धरण आणि वीज केंद्राच्या बांधकामादरम्यान धरण विरोधात सत्याग्रह करण्यात आला (एप्रिल १९२१ ते डिसेंबर १९२४). विनायक भुस्कुटे[] आणि पांडुरंग महादेव बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले, ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्प बांधण्यासाठी घेण्यात आली होती त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही चळवळ होती. त्यांच्या नेतृत्वाची दखल घेऊन पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती (सेनापती) असे नाव देण्यात आले.[][]

मूळशी धरण बांधून १०० वर्षे जरी होऊन गेली तरी धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. []

१९३७ मध्ये सरकार आणि टाटा पॉवर कंपनी यांच्यात भूसंपादन कायदा (१८९४) अंतर्गत झालेल्या करारानुसार, अधिग्रहित जमीन आणि भरपाई खालीलप्रमाणे होती []:

अ. क्र. गावाचे नाव क्षेत्रफळ-एकर क्षेत्रफळ-गुंठे भरपाई (रु)
1 अडगाव 234 15 12180
2 अहरवाडी 353 39 36789
3 अकसाई 295 36 47857
4 अंबवणे 082 23 03628
5 अवळस 811 1 156747
6 बर्पे (बु.) 606 39 62396
7 बर्पे (खु.) 355 19 39271
8 भडस (खु.) 372 12 65132
9 भांभुर्डे (खु.) 062 14 4610
10 भोरकस 640 5 122805
11 चाचीवली 240 20 58236
12 चांदिवली 51 35 11781
13 दावडी 43 35 8000
14 देवळोली 380 7 65742
15 घांगोळ 59 25 11367
16 गोणावाडी 211 25 67562
17 कुंभेरी 380 39 29351
18 माले 32 39 3048
19 मोहोरी 411 18 85241
20 मुळापूर 504 35 70575
21 मूळशी (बु.) 517 8 98439
22 मूळशी (खु.) 383 28 59320
23 नांदीवली 384 00 120146
24 नानीवली 254 19 64770
25 निंबरवाडी 201 21 41524
26 नीवे 143 18 39195
27 निवरवंडे 281 21 66138
28 पळसे 212 10 52785
29 परीटवाडी 190 29 31427
30 पिंपरी 157 19 12516
31 पोमगाव 134 6 29399
32 सांभवे 64 9 5766
33 सांगवी 160 11 27843
34 सारुळे 310 17 67524
35 शेडानी 703 6 194960
36 शिरगाव 237 7 66386
37 शिरोळी 587 33 126004
38 ताम्हिनी (बु.) 184 33 18270
39 ताम्हिनी (खु.) 215 22 27884
40 तिस्करी 207 35 9056
41 तिस्ता 145 13 20122
42 वडगाव 485 29 84501
43 वडवाठार 540 36 111668
44 वेल्होळी 231 15 31604
45 वडस्ते 676 27 112259
46 वळणे 708 11 156530
47 वांद्रे 241 2 31292
48 वारक 379 35 85412

एकूण संपादित जमीन १५०७३ एकर आणि ३५ गुंठे होती, ज्याची भरपाई २७,५५,०८२ रुपये देण्यात आली.

याशिवाय, घरे, झाडे आणि मंदिरांसाठी भरपाई म्हणून ३७७,४०३ रुपये देण्यात आले.

अशा प्रकारे, एकूण भरपाई ३,१३२,४८५ रुपये देण्यात आली.

पर्यटन

संपादन

अलिकडच्या वर्षांत मुळशी आणि आसपासच्या परिसरांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले गेले व त्यामुळे मनोरंजनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी निवास व्यवस्था वाढली आहे. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे २ तासांच्या अंतरावर आहे आणि आठवड्याच्या शेवटी सुटी घालवण्यासाठी ते एक प्रमुख आकर्षण आहे. मुळशीला भेट देण्यासाठी वर्षातील सर्वोत्तम वेळ ऑगस्ट ते ऑक्टोबर असतो.


अन्य वाचनासाठी

संपादन

मुळशी धरणग्रस्तांच्या समस्येवर पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख राजेंद्र व्होरा यांनी 'वल्ड्स फस्ट ॲन्टी डॅम मूव्हमेंट' हे पुस्तक लिहिलेले आहे.

  1. ^ "Mulshi_Dam_D03170". 14 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 November 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Bhuskute, Vinayak (2021). मूळशी सत्याग्रह. सह्याद्री प्रकाशन, मुळशी. p. 5.
  3. ^ Gadgil, Madhav; Guha, Ramachandra (2013). Ecology and Equity: The Use and Abuse of Nature in Contemporary India. Routledge. p. 69. ISBN 9781135634889.
  4. ^ Cashman, Richard I. (1975). The Myth of the Lokamanya: Tilak and mass politics in Maharashtra. University of California. p. 190. ISBN 9780520024076.
  5. ^ पवार, अनिल (२०२४). पवार, अनिल (ed.). सह्याद्रीचे अश्रू. कृष्णा पब्लिकेशन्स, पुणे. p. ७४८. ISBN 9788194975014.
  6. ^ Vora, Rajendra; Vora, Rajendra (2009). The world's first anti-dam movement the Mulshi satyagraha, 1920-1924. Permanent Black, Distributed by Orient BlackSwan. p. 192.