मुग्धबलाक
आशियाई मुग्धबलाक,घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा करकोचा (इंग्रजी: एशियन ओपन बिल किंवा एशियन ओपन बिल स्टॉर्क) हा करकोचा जातीचा पक्षी असून नावाप्रमाणेच याची चोच उघडी असते. चोच बंद केल्यावर याच्या चोचीतील फट स्पष्टपणे दिसते.
शास्त्रीय नाव |
(Anastomus oscitans) |
---|---|
कुळ |
बलाकाद्य (Ciconiidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
एशियन ओपनबिल (Asian Openbill) |
संस्कृत | शंबूक भंजन |
हिंदी | घोंघिल, गुंग्ला |
वर्णन
संपादनउघड्या चोचीच्या करकोच्याच्या चोचीमध्ये अडकित्त्याप्रमाणे फट असते. चोच बंद केली तरी ही फट दिसते. याची शेपटी काळी असते. तसेच उड्डाण पिसे काळी असतात. पाय मळकट गुलाबी रंगाचे असतात. ते विणीच्या हंगामात गडद गुलाबी होतात.
खाद्य
संपादनपाण्यातील शंख, शिंपल्यातील मृदुकाय प्राणी, बेडूक, खेकडे, गोगलगायी, पाण्यातील कीटक इ. खातो.
आढळ
संपादनभारतातील हा स्थानिक रहिवासी पक्षी आहे. भातखाचरे, सरोवरे, तळी, खाडया अशा पाणथळ जागेत हा पक्षी वास्तव्यास असतो.[१] महाराष्ट्रातसुद्धा हा पक्षी सर्वत्र आढळतो.
बाह्य दुवे
संपादनचित्रदालन
संपादन-
नवेगाव, महाराष्ट्र येथील सारंगागार
-
लहानगे- उप्पलपडु, आंध्र प्रदेश, भारत येथील दृश्य .
-
आंध्र प्रदेश, भारत येथील सारंगागार
-
घरट्यासाठी काड्या नेताना- उप्पलपडु, आंध्र प्रदेश, भारत येथील दृश्य.
-
आंध्र प्रदेश, भारत येथील सारंगागार
-
आंध्र प्रदेश, भारत येथील सारंगागार
-
आशियाई मुग्ध बलाक
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील रातथाऱ्याचे दृश्य
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील आशियाई मुग्ध बलाक आणि राखी बगळे
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील आशियाई मुग्ध बलाक आणि राखी बगळे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Grimmett, Inskipp and Inskipp. Birds of India. ISBN ISBN 0-691-04910-6 Check
|isbn=
value: invalid character (सहाय्य).