मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ - १४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मीरा भाईंदर मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ८, १७ ते ३६, ४१ ते ४४, ४६ आणि ४७ यांचा समावेश होतो. मीरा भाईंदर हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

अपक्ष उमेदवार गीता भरत जैन ह्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ गीता भरत जैन अपक्ष
२०१४ नरेंद्र मेहता भारतीय जनता पक्ष
२००९ गिल्बर्ट जॉन मेंडोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".