मीरा चोप्रा

भारतीय अभिनेत्री

मीरा चोप्रा, ऊर्फ नीला या भारतीय अभिनेत्री व मॉडेल असून त्यांनी तामिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'गॅंग्स ऑफ घोस्ट्स्' या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाच्या कार्यक्रमात मीरा चोप्रा

वैयक्तिक जीवन

संपादन

मीरा या बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रापरिणीती चोप्रा आणि मन्नाना यांच्या बहिण आहेत.

चित्रपट कारकीर्द

संपादन

आनबे औयिरे या तामिळ चित्रपटातून त्यांनी एस.जे. सूर्या यांच्यासोबत पदार्पण केले. त्यानंतर पवन कल्याण यांच्यासोबत दुसरा चित्रपट केला. एम. एस. राजू यांच्या 'वाना' मध्येही त्या चमकल्या. विक्रम भट्ट यांच्या '१९२० लंडन' या चित्रपटामधून त्यांनी शर्मन जोशी यांच्यासोबत बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. सतीश कौशिक यांच्या येऊ घातलेल्या 'गॅंग्स ऑफ घोस्ट्स्' या चित्रपटामध्येही त्यांनी काम केलेले आहे.