मिश्या (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: मिशी, अनेकवचन: मिश्या) म्हणजे वरच्या ओठांच्या वरील बाजूस उगवणारे चेहऱ्यावरील दाट केस होत. चेहऱ्याचा खालचा अर्धा भाग व्यापणाऱ्या दाढीसह किंवा दाढीविना, अशा दोन्ही प्रकारे राखलेल्या मिश्या असू शकतात. चेहरऱ्यावर नुकत्याच उगवू लागलेल्या किंवा झुपकेदार नसलेल्या मिशीला मिसरूड म्हणतात. माणसांप्रमाणे काही किड्यांना आणि काही प्राण्यांनाही मिशा असतात, पण त्या झुपकेदार वा दाट नसून ताठ उभे राइलेल्या चारदोन केसांप्रमाणे असतात. झुरळ, मांजर, वाघ, सिंह या प्राण्यांना तशा मिशा असतात, तर बोकडाला माणसाप्रमाणेच दाढी असते. ऑटर आणि उंदीर या प्राण्यांनाही दाट नसलेल्या दाढी-मिशा असतात.

ऑस्ट्रिया-एस्तेचा आर्चड्यूक फ्रांत्स फेर्डिनांड (इ.स. १८६३ - इ.स. १९१४) पिळदार मिश्यांच्या भूषेसह

इतिहास

संपादन
 
पाझिरिक घोडेस्वाराचे चित्र' - सेंट पीटर्सबर्ग येथील स्टेट हर्मिटेज संग्रहालयात असलेल्या गालिच्यावरील चित्र (निर्मितिकाळ: इ.स.पू. ३००)

नवपाषाणयुगापासून दगडी वस्तऱ्याने चेहऱ्यावरील केस काढण्याचे तंत्र मानवांना ज्ञात होते [ संदर्भ हवा ]. मात्र दाढी न राखता केवळ मिश्या राखलेल्या पुरुषाचा सर्वांत पुरातन पुरावा इ.स.पू. ३०० च्या सुमारास चितारलेल्या सिथियन (इराणी) घोडेस्वाराच्या चित्राच्या रूपाने आढळतो.

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत