मिलिंद गाडगीळ
मिलिंद गोपाळ गाडगीळ (?? - ऑक्टोबर २००७) हे एक युद्धवार्ताहर होते. ते संपादक, लेखक, युद्धशास्त्राचे अभ्यासक, अर्थकारणाचे भाष्यकार होते. लेखक गंगाधर गाडगीळ हे त्यांचे मोठे बंधू होत.
मिलिंद गाडगीळ यांना वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश मिळाला असताना सैन्यदलाच्या आकर्षणापोटी ते महाविद्यालय सोडून सैन्यात भरती झाले. एका अपघातामुळे त्यांची सैन्यातील कारकीर्द अल्प ठरली. गाडगीळ यांचा 'वॉर रूम'मधले डावपेच, त्यामागचे राष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणही या सर्वांचा अभ्यास होता. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधून याबद्दल लिहिले.
मराठीत यांचे एक पुस्तक आहे. "युद्धाच्या छायेत भारत" आजच्या घडीला हे पुस्तक जरी जुने असले तरी यातिल माहिती विशेष व मुलभुत बाबींचे झान वाढवणारी आहे.
प्रखर देशप्रेमी,राष्ट्रहितचिंतक,सैन्यास भेट देत राहणारा हा लेखक अजोड होता.
युद्धवार्ताहर
संपादनयुद्धभूमीवर उभे राहून बातम्या देणाऱ्या दुर्मिळ युद्धवार्ताहरांमध्ये गाडगीळ होते. त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातली १९६५ व १९७१ची युद्धे, व्हिएतनाम युद्ध, १९७३मधला अरब-इस्रायल आणि इराण-इराक युद्ध या साऱ्या ठिकाणाहून स्वतः वार्तांकन केले. त्यांनी हिंदुस्थान समाचार, बीबीसी आणि रॉयटर्स सह अनेक वृत्तसंस्थांसाठीही वार्तांकन केले.
भारत-पाक युद्धानंतर १९६५ साली ताश्कंद येथे तह झाला तेव्हा गाडगीळ तेथे होते. वयाच्या ६३व्या वर्षी गाडगीळ बटालिकच्या संग्रामस्थळी.
गाडगीळ यांनी सकाळ, नवशक्ती, तरुण भारत या दैनिकांमध्ये काम केले तसेच अनेक नियतकालिकांमध्येही लिखाण केले. विश्व संवाद केंद्राने प्रकाशित केलेला नॅशनल सिक्युरिटी : ॲन ओव्हरव्ह्यू हा गंथ गाडगीळ यांनी संपादित केला होता. त्यांनी सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. स्वातंत्र्यवीरांनी फ्रान्सच्या मार्सेल बंदराजवळ जी उडी घेतली तिचे त्या किनाऱ्यावर स्मारक व्हावे यासाठी त्यांनी काम केले.