मिताली राज

(मिथाली राज या पानावरून पुनर्निर्देशित)

मिताली राज (जन्म : ३ डिसेंबर १९८२) या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज यांनी एकाहून अधिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (२००५ आणि २०१७) भारताचे नेतृत्व केले असून असा मान मिळणाऱ्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत.

मिताली राज
मिताली राज
भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने फलंदाजी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने १११
धावा ५७२ ३४३६
फलंदाजीची सरासरी ५२.०० ४७.७२
शतके/अर्धशतके १/३ २/२८
सर्वोच्च धावसंख्या २१४ ११४*
षटके १२ १७१
बळी
गोलंदाजीची सरासरी - ११.३७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी - ३/४
झेल/यष्टीचीत ७/० २३/०

मार्च १२, इ.स. २००९
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

दहा हजार धावा संपादन

मिताली राजने १२ मार्च २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ धाव घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेट खेळाडू आहे.

पुरस्कार संपादन

चरित्रपट संपादन

मिताली राज यांच्या जीवनावर आणि क्रिकेट कारकिर्दीवर एक हिंदी चित्रपट येत आहे. त्या चित्रपटात मिताली राज यांची भूमिका तापसी पन्नू करीत आहे.

साचा:भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७

  1. ^ "National Sports Awards 2021 announced". pib.gov.in. 2021-11-20 रोजी पाहिले.