षटक (क्रिकेट)

(षटके या पानावरून पुनर्निर्देशित)

षटक म्हणजे क्रिकेटच्या खेळातील एक एकक आहे.

चेंडू

क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात एक किंवा दोन खेळ्या असतात. प्रत्येक खेळीत दोन डाव असतात. प्रत्येक डाव निश्चित बळी (विकेट) किंवा षटकांचा असतो.

प्रत्येक षटक म्हणजे सहा (सध्याच्या नियमांप्रमाणे) बॉलचा संच असतो. एक बॉलरने (गोलंदाज) सहा वेळा नियमानुसार चेंडू टाकला की एक षटक पूर्ण होते (या नियमास अपवाद आहे. या साठी खालील नोंदी पहा.) या सहा चेंडूत नो बॉल, वाइड बॉल किंवा डेड बॉल धरले जात नाहीत.

एका बॉलरला लागोपाठ दोन षटके टाकता येत नाहीत. क्रिकेटच्या काही प्रकारांत (एक दिवसीय) प्रत्येक बॉलरला जास्तीत जास्त निश्चित प्रमाणातच षटके टाकता येतात.

  • काही वर्षांपूर्वी एक षटक(?) आठ चेंडूंचे असायचे. त्यास अष्टक म्हणता येईल.
  • काही कारणास्तव (दुखापत, पंचाने मज्जाव करणे, इ.) एखाद्या बॉलरला षटक पूर्ण करता नाही आले तर दुसऱ्या बॉलरला ते षटक पूर्ण करण्याची मुभा असते. या नवीन बॉलरला कथित षटकाच्या लगेच आधीचे किंवा लगेच नंतरचे षटक टाकता येत नाही.