मिडियाविकी चर्चा:Recentchanges

"अलिकडील" हेच बरोबर वाटते संपादन

"अलिकडिल" असे लिहिण्यामागे काही संदर्भ?

केदार {संवाद, योगदान} 13:55, 11 डिसेंबर 2006 (UTC)

"अलीकडे/ अलीकडिल" ही रूपे बरोबर आहेत. मला "मराठी शब्दरत्नाकर - संकलक - वा. गो. आपटे" या शब्दकोशात पाहिल्याचे स्मरते. आज पुन्हा एकदा खात्री करून सांगतो.
संकल्प द्रविड 13:57, 11 डिसेंबर 2006 (UTC)
मला "अली/अलि" बद्दल कल्पना नाही पण "कडील" मधला "डी" नेहमी दीर्घ वाचल्याचे आठवते आहे.
केदार {संवाद, योगदान} 14:05, 11 डिसेंबर 2006 (UTC)
केदार, तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो शब्द पूर्वी होता तसाच "अलीकडील" असा हवा. मी योग्य ते फेरबदल करीन. मी "मराठी शब्दरत्नाकर - संपादक: वासुदेव गोविंद आपटे" (अनमोल प्रकाशन, पुणे) या संदर्भग्रंथातून खातरजमा करून बघितली. त्याप्रमाणे "अलीकडे" वगैरे शब्दांत "ली" दीर्घ असतो, आणि "कडील" या शब्दात "डी" असे दीर्घलेखनच होते.
--संकल्प द्रविड 17:37, 11 डिसेंबर 2006 (UTC)
तुम्ही वापरलेल्या संदर्भाची कृपया इथे नोंद लिहून ठेवा म्हणजे नंतर गरज पडली तर इतरांना पाहता/दाखवता येईल.
केदार {संवाद, योगदान} 17:46, 11 डिसेंबर 2006 (UTC)
"Recentchanges" पानाकडे परत चला.