मिठागरे
समुद्राच्या पाण्यापासून बाष्पीभवनाने मीठ बनवण्याचे ठिकाण
मिठागरे हे समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे असतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. भारतातील ओरिसा येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे. मिठागारांना मीठाची शेते असेही म्हणले जाते.
पालघर जिल्ह्यात माहीम, केळवे, वसई,डहाणू येथे पेशवेकालीन मिठागरे आहेत.वसई डहाणू पट्ट्यात १५ हजार एकरांवर मिठाचे उत्पादन घेतले जाते त्यापैकी वसई तालुक्यात १७०० एकर जमीन क्षेत्रावर ते घेतले जाते. मीठ उत्पादन हा पारंपरिक व्यवसाय आहे. वनराशी मिठागर, आगरवती सलाम, नवामुख, हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक ही वसई तालुक्यातील काही मिठागरे आहेत.
संदर्भ
संपादनमुंबई टाईम्स ३०/०५/२०२०.