प्रा. मा.म. देशमुख हे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले नाव आहे. ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमधून इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.

समाजकार्य

संपादन

मा.म. देशमुख हे एक महान तत्त्वज्ञ, इतिहास संशोधक होते. विविध पुस्तके व व्याखाने देऊन त्यांनी लोकजागृती केली.[ संदर्भ हवा ]

लिहिलेले ग्रंथ

संपादन

राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत. त्यांतील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. पण अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी हायकोर्टाकडून बंदी उठवली. त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजेना नफाना तोटा तत्त्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.[ संदर्भ हवा ]

 1. अभिनव अभिरूप ‌
 2. अभ्यास असा करावा
 3. जय जिजाऊ
 4. प्राचीन भारताचा इतिहास
 5. बहुजन समाज आणि परिवर्तन
 6. बौद्ध धम्म आणि शिवधर्म
 7. भांडारकर झॉंकी है, शनिवारवाडा बाकी है
 8. मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली, हायकोर्टाने बंदी उठवली.)
 9. मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
 10. मनुवाद्याशी लढा (नववी आवृती)
 11. मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
 12. मराठ्यांचे दासीपुत्र (संपादित)
 13. युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा
 14. रामदास आणि पेशवाई
 15. वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
 16. राष्ट्रनिर्माते
 17. शिवराज्य
 18. शिवशाही
 19. सन्मार्ग
 20. समाज प्रबोधन
 21. साहित्यिकांची जबाबदारी

मा.म.देशमुख यांच्या भाषणाच्या व्हीडिओ सी.डी

संपादन
 1. अविद्येपेक्षा कुविद्या भयानक
 2. आरक्षण भाग १
 3. आरक्षण भाग २
 4. कांशीराम
 5. क्रांतिकारी भाषण
 6. छत्रपती शिवराय
 7. डॉ. पंजाबराव देशमुख
 8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज
 9. बौद्ध धम्म आणि शिवधर्म
 10. ब्राह्मणी थोतांड
 11. न्या. सावंत मुलाखत
 12. हिंदू राष्ट्रवाद

मा.म.देशमुख यांचे विचार

संपादन

मी स्पष्टवक्तेपणा वापरून इतिहास संशोधन समोर आणण्याचे काम केले आहे व ते अखंड सुरू आहे. "ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर केव्हा ही होईल सपाट" पासून ते "ज्या घरी पुस्तकांचे कपाट आणि काम्पुटर, ते घर होईल जगात अग्रेसर" असे बदलत्या काळानुसार पुरोगामी विचार त्यांनी मांडले आहेत.

पुरस्कार

संपादन

मा.म.देशमुख यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.त्यातील काही ठळक पुरस्कार खालीलप्रमाणे.

 1. 'दै.जनता' पेपराचा महानायक जीवन गौरव पुरस्कार.

बाह्य दुवे

संपादन