माहिम हलवा
माहीम हलवा ही एक भारतीय मिठाई आहे. मुंबईतील माहीम या ठिकाणाच्या नावावरून ही मिठाई ओळखली जाते. याला बर्फाचा हलवा किंवा पेपर हलवा म्हणून देखील ओळखले जाते.[१]
माहीम येथील मिठाईवाले जोशी बुधाकाका यांनी तयार केल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे.[२] मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी ही एक मिठाई आहेस.[३] २०१० मध्ये या मिठाईला भौगोलिक संकेत नोंदणी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता.
इतिहास
संपादनया मिठाईचे मूळ मुंबईजवळील माहीमच्या बेटावरील आहे. मोहनलाल मिठाईवाला यांनी ही मिठाई विकायला सुरुवात केली होती.[४] नंतर संपूर्ण मुंबईत ही मिठाई विकली जाऊ लागली आणि नंतर देशाच्या इतर भागांमध्येदेखील माहीम हलवा लोकप्रिय झाला.[५]
मूळ चव सर्वत्र सारखीच राहते परंतु रंग आणि जाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल असू शकतो.
साहित्य
संपादन- कॉर्न फ्लोअर
- दूध
- साखर
- तूप
- फूड कलर
- ड्रायफ्रुट्स
- वेलची किंवा इलायची पावडर.
हेदेखील पाहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Ever Heard of Bombay Ice Halwa? This Dessert Melts In Mouth In The First Bite". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2022-05-18 रोजी पाहिले.
- ^ Jan 27, Updated :; 2016; Pt, 01:50. "Go time travelling with these long-standing eateries". BombayTimes. 2022-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Karanjia, B. K. (2004). Vijitatma: Founder-pioneer Ardeshir Godrej (इंग्रजी भाषेत). Viking. ISBN 978-0-670-05762-7.
- ^ Sagaya, Mary. "Bombay Ice Halwa, melts in mouth in First Bite". The Hans India (इंग्रजी भाषेत). 2022-05-20 रोजी पाहिले.
- ^ Kitchen, Hebbars (2019-01-11). "ice halwa recipe | bombay ice halwa | mumbai halwa or mahim halwa". Hebbar's Kitchen (इंग्रजी भाषेत). 2022-05-20 रोजी पाहिले.