दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर कार्तिक वारी २०१४ला प.पू.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते पंढरपूर येथे प्रथम प्रकाशित झाले. मानव समाजाच्या चीरकल्याणाचे प्रकाशगीत गाणाऱ्या संत महात्म्यांचे व समाज सुधारकांचे दर्शन या मासिकातून व्हावा असा दृष्टिकोन अभिप्रेत आहे.

मुख्य संपादक: अक्षय महाराज भोसले

मासिकातील विविध विभाग:

  • संपूर्ण जगभरातील वारकरी संप्रदायाच्या घडलेल्या व घडणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमाच्या बातम्या.
  • प्रखर राष्ट्र व वैष्णव - भागवत धर्मभक्तीचा प्रसार
  • संप्रदायातील सर्वव फडांची , संस्थांची माहिती व परंपरा इतिहास.
  • वारकरी संप्रदायातील साधू , संत , महात्मे , महाराज यांची माहिती व कार्य.
  • संप्रदायचे संत व तीर्थक्षेत्र यानाची विस्तृत माहिती.
  • अध्यात्म - भक्ती , वेदांत , ज्ञान, संत साहित्य
  • संप्रदायातील कीर्तनकार , प्रवचनकार , गायक , वादक यांची सचित्र माहिती .
  • आरोग्य - ( योग ,प्राणायम , आयुर्वेद - भारतीय चिकित्सा )
  • स्त्री- शिक्षण, संपूर्ण महाराष्ट्र १०० % व्यसनमुक्त, अंधश्रद्धा निर्मुलन (आधारभूत केवळ संतसाहित्य), पर्यावरण संवर्धन
  • धर्मकारण व समाजकारण यांचा दुहेरी संगम

विविध आवृत्या

  • मुंबई विभाग आवृत्ती
  • पुणे विभाग आवृत्ती
  • कोकण विभाग आवृत्ती
  • पश्चिम महाराष्ट्र विभाग आवृत्ती
  • मराठवाडा विभाग आवृत्ती
  • खानदेश विभाग आवृत्ती
  • विदर्भ विभाग आवृत्ती