मावा (कीड)
मावा हा पिकांवर आढळणारा एक कीटक आहे.हा साधारणतः कापूस, करडई या पिकावर जास्त आढळतो. या कीटकामुळे कापसास चिकटा हा रोग होतो.इतर पिकांवरही याचा प्रादुर्भाव होतो.[१]
वर्णन
संपादनहा किडा सुमारे १ ते २ मिमी आकाराचा असून त्याचे शरीर मऊ असते.त्याचा रंग साधारणतः हिरवट,तपकिरी किंवा काळसर हिरवा असतो.हा कीटक चिकट व गोडसर पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकतो.हा द्रवपदार्थ खाण्यास मुंग्या त्या बाधित रोपावर जमा होतात.त्यांचे पाठीवर बसून माव्याची पिल्ले दुसऱ्या रोपट्यावर स्थलांतर करतात व त्यास बाधित करतात.[१]
प्रजनन
संपादनमावा मादीचे प्रजनन संयोगाविना होते.मादी सरासरीने १५ पिलांना जन्म देते.याची वाढ साधारणतः १ आठवड्यात पूर्ण होते.याच्या जगण्याची दर मर्यादा २ ते ३ हप्ते आहे.[१]
पिकांचे कोणत्या प्रकारचे नुकसान
संपादनहा कोवळ्या वनस्पतींवर जगणारा कीटक असल्यामुळे,वाढलेल्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे तो नुकसान अधिक करतो.हा पानाचे खालच्या बाजूस राहून त्याचा रसाचे शोषण करतो.त्यामुळे पिकांची पाने दुमडतात.वनस्पती करपतात.त्यांची वाढ नीट होत नाही.
कीटनियंत्रण
संपादननैसर्गिक शत्रुंद्वारे कीटनियंत्रण
संपादन- ladybug,
- राख.
इतर उपाय
संपादनदशपर्णीचा नियमित वापर.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |