मालविकाग्निमित्रम

(मालाविकाग्निमित्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

मालविकाग्नीमित्र हे कालिदासाच्या तीन नाटकांपैकी एक नाटक आहे. दशरूपक प्रकारांपैकी नाटक हा एक उत्कृष्ट रूपकप्रकार आहे.

संक्षिप्त कथानकसंपादन करा

विदिशा नगरीचा शुंग कुळातील राजा अग्निमित्र हा त्याच्या पट्टराणीच्या दासीच्या, मालविका च्या प्रेमात पडतो. मालविका ही दासी कुठल्याशा देशातून निर्वासित झालेली असते. राणीला जेव्हा आपल्या नवऱ्याचे दासीप्रती असणारे आकर्षण समजते तेव्हा ती मालविकेला तुरुंगात टाकते. अनेक अडचणी आणि कारस्थानातून वाट काढत शेवटी राजा मालविकेला भेटतो. अंततः मालविका ही राजकुळातील असल्याचे समजते आणि अग्निमित्राची राणी म्हणून स्वीकारली जाते.