मारुगामे किल्ला (丸 ame 城 मारुगामे-जे), याला काम्यामा किल्ला आणि होराई किल्ला या नावानेही ओळखले जाते. जपानच्या कागावा प्रांतातील मारुगामे येथे वसलेला आहे. हा एक हिरयामा शिरो (टेकडीवरचा किल्ला ज्याच्या सभोवताली सपाट मैदान आहे) प्रकारचा किल्ला आहे.

मारुगामे किल्ला
丸亀城
मारुगामे, कागावा प्रांत, जपान
मारुगामे किल्ल्याचा बालेकिल्ला टेंशू्e Map
प्रकार हिरयामा शिरो
Site history
याने बांधले नरा मोटोयासु
सध्या वापरात १५८७ - १६१५;१६४४ - १९४५ []

इतिहास

संपादन

या किल्ल्याच्या जागेवर बांधलेली पहिली तटबंदी ही नारा मोटोयासू यांच्या नेतृत्वाखाली नार कुळातील लोकांनी उभारली होती. हेच मुरोमाची कालखंडात होसोकावा कुळाचे अनुयायी होते. या गोष्टीचा आज फारच थोडा पुरावा उपलब्ध आहे.

 
क्योशी ताकाहामा यांचे स्मारक

या किल्ल्याची मुळे १५८७ मध्ये सापडतात. त्यावेळेस मारुगामे किल्ल्यात सनुकी प्रांताचा मालक इकोमा चिकमसा हे रहात होते. [] इ.स. १५९७ मध्ये, चिकामासाने ताकामात्सू किल्ल्याची निर्मिती केली आणि राज्य करण्यासाठीचे त्यांचे नवीन स्थान बनवले. मारुगामे किल्ला त्याने त्याच्या मुलाकडे, इकोमा काजुमासाकडे सोपावला. [] काझुमासाने ताबडतोब किल्ल्याचे नूतनीकरण करण्यास सुरुवात केली आणि किल्ला अजून मजबूत केला. तथापि, १६१५ मध्ये शोगुनालने काढलेल्या फरमानाप्रमाणे, प्रत्येक प्रांताला फक्त एकच किल्ला असायला हवा होता. त्यामुळे मारुगामे किल्ला उध्वस्त करण्यात आला.

इ.स. १६३८ मध्ये, शिमाबारा बंडखोरीच्या पराक्रमासाठी यमाझाकी इहारूला किल्ल्यातील पश्चिमेकडील सनुकीचा एक छोटासा भाग (मारुगामे किल्ल्याच्या उरलेल्या भागातून) बक्षीस म्हणून देण्यात आला. इहारूने तेव्हा वाचलेल्या अवशेषांवर नवीन इमारतींचे बांधकाम केले. त्याने केलेले बहुतेक काम आजही दिसून येते. त्याचे बांधकाम इ.स. १६४४ मध्ये पूर्ण झाले. तथापि, १६५८ मध्ये हा किल्ला किगोको कुळाकडे सुपूर्द करण्यात आला. इ.स. १६७० मध्ये ओटेमॉन कॉम्प्लेक्सची पुनर्बांधणी करून त्यांनी किल्ल्यात आणखी सुधारणा केली. शाही सरकारने मेइजीच्या जीर्णोद्धारादरम्यान किल्ला ताब्यात घेईपर्यंत किर्गोकूने किल्ल्यावरील नियंत्रण अबाधित राखले.

इ.स. १८६९ मध्ये किल्ल्यात आग लागली आणि बऱ्याच इमारती नष्ट झाल्या. [] त्यानंतर १८७० मध्ये जे काही राहिले होते त्यातील बरेच काही शाही सरकारने नष्ट केले. त्यानंतर लवकरच बाह्य खंदक देखील मातीने भरून टाकला.

सद्यस्थिती

संपादन

दगडी भिंतींच्या व्यतिरिक्त, आजही मारुगामे किल्ल्यातील काही इमारती उभ्या आहेत. इ.स. १९५० मध्ये ओटे इचिनो गेट, ओटे निनो गेट आणि टेन्शु (बालेकिल्ला) यांचे मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आले. या मूळ इमारती जपानी सरकारने महत्त्वपूर्ण सांस्कृतिक ठेवा म्हणून घोषित केल्या आहेत. इ.स. १८६० पूर्वी बांधलेला आणि मूळ लाकडी टेंशू हयात असलेल्या फक्त डझनभर जपानी किल्ल्यांपैकी मारुगामे हा एक किल्ला आहे. [] हा किल्ला सध्या काम्यामा पार्कमध्ये संरक्षित आहे. त्याचे संग्रहालय त्याच्या टेंशूमध्ये बांधलेले आहे. [] या किल्ल्याचे नाव जपानमधीला १०० उत्तम किल्ल्यांच्या यादीत टाकलेले आहे.

साहित्य

संपादन
  • Benesch, Oleg and Ran Zwigenberg (2019). Japan's Castles: Citadels of Modernity in War and Peace. Cambridge: Cambridge University Press. p. 374. ISBN 9781108481946.
  • Mitchelhill, Jennifer (2013). Castles of the Samurai:Power & Beauty. USA: Kodansha. ISBN 978-1568365121.
  • Motoo, Hinago (1986). Japanese Castles. Tokyo: Kodansha. pp. 200 pages. ISBN 0-87011-766-1.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Marugame Castle". 2008-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-28 रोजी पाहिले.
  2. ^ Kameyama Koen Park in Kagawa - attractions in Shikoku Japan Archived 2008-06-22 at the Wayback Machine.
  3. ^ Marugame Castle Archived 2008-03-12 at the Wayback Machine.
  4. ^ Marugame City Official Website Tourism
  5. ^ Marugame Castle :: Japan Visitor