राग मारवा

(मारवा या पानावरून पुनर्निर्देशित)

राग मारवा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मारवा रागः थाट आणि इतर वैशिष्ट्येसंपादन करा

जातिः षाढव - षाढव

थाटः मारवा

वादी स्वरः रिषभ

संवादी स्वरः धैवत

गायन समयःचौथा प्रहर

विश्रांती स्थानः सा; रे१; ध; - ध; रे१; सा;

मुख्य अंगः सा ; ,नि ,ध सा ,नि रे१ ; रे१ ग म् ध ; ध म् ग रे१ ; ,नि ,ध रे१ सा ;

आरोह - अवरोहः सा ,ध ,नि रे१ ग म् ध नि सा' - सा' नि ध म् ग रे१ सा ; ,नि ,ध सा ,नि रे१ सा ;

राग मारवा हा अतिशय मधूर स्वरांचा राग आहे. याच्या सादरीकरणात रिषभ आणि धैवत या स्वरांवर ठहराव घेतला जातो, ज्यातून राग मारवा स्पष्ट होतो. या रागाचं विस्तार-क्षेत्र तसं मर्यादित आहे आणि सहसा मध्यसप्तकात या रागाच्या सादरीकरणाची मांडणी केली जाते. या रागातून वैराग्याची भावना उत्पन्न होते.

अशाच जातकुळीतला आणखी एक राग म्हणजे "राग पुरिया". मारवा ऐकत असताना अनेकदा राग पुरिया ऐकतोय असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण बारकाईने ऐकल्यास चटकन लक्षात येईल की पुरिया रागामध्ये गंधार आणि निषाद या स्वरांवर अधिक ठहराव घेतला जातो आणि मारवाचे वादी - संवादी स्वर रिषभ आणि धैवत हे आहेत.

मारवा रागाची लक्षण स्वरावलीसंपादन करा

सा

नि ,ध ,नि रे१

ग म् ध ; म् ग रे१

नि ,ध रे१ सा

म् ध

ध नि रे१' नि ध

म् ध

म् ग रे१

ग रे१ ,नि ,ध रे१ सा