माधव वझे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माधव वझे (२१ ऑक्टोबर, १९३९ - ७ मे, २०२५) हे आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट होते.
माधव वझे | |
---|---|
![]() माधव वझे | |
जन्म |
माधव वझे २१ ऑक्टोबर, १९३९ |
मृत्यू |
७ मे, २०२५ (वय ८५)[१] पुणे, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९५३-२०२५ |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | श्यामची आई (चित्रपट) |
माधव वझे हे पुण्याच्या वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.
माधव वझे यांची भूमिका असलेली नाटके
संपादनमाधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट
संपादन- डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट, २०१६)
- ३ इडियट्स (हिंदी चित्रपट, २००९)
- श्यामची आई (बालनट, १९५३)
- छप्पड़ फाड़ के (२०१९) आत्माराम गुपचूपच्या भूमिकेत[२]
- वहिनींच्या बांगड्या (१९५३)[२]
माधव वझे यांची पुस्तके
संपादन- प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन - माधव वझे)
- रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे)
- श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी (आठवणी)
संदर्भ
संपादन- ^ Bhagyashree Rasal (7 May 2025). "Actor Madhav Vaze passes away". Maharashtra Times. 7 May 2025 रोजी पाहिले.
- ^ a b "Madhav Vaze". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-05-07.