मातृमंदिर
श्रीअरविंद आश्रमाच्या श्रीमाताजींनी स्थापन केलेल्या ऑरोविलच्या मध्यभागी, मातृमंदिर आहे. पूर्णयोगाच्या अभ्यासकांसाठी आध्यात्मिक महत्त्व असलेली ही इमारत आहे. याला 'ऑरोविलचा आत्मा' (सोल ऑफ द सिटी ) ( फ्रेंच : L'âme de la ville ) असे म्हणतात.
‘मातृमंदिर’ हे केवळ एखादे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ नाही. तर ते व्यक्तीला शांतचित्ताने एकाग्रता करता यावी यासाठी निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. व्यक्तीने मनाच्या शांत, समचित्त अवस्थेत तेथे प्रवेश करणे अपेक्षित आहे.
मातृमंदिर | |
---|---|
मातृमंदिर, ऑरोविल | |
सर्वसाधारण माहिती | |
वास्तुकलेची शैली | गोलाकार |
शहर | ऑरोविल, तामिळनाडू |
पायाभरणीचा दिवस | २१ फेब्रुवारी १९७१ |
Website | |
Description of the Matrimandir from Auroville's website |
रचना आणि परिसर
संपादनमातृमंदिर बांधण्यासाठी ३७ वर्षे लागली. २१ फेब्रुवारी १९७१ रोजी त्याची पायाभरणी झाली. त्याची उभारणी मे २००८ मध्ये पूर्ण झाली. मध्यभागी भव्य गोलाकार रचना आहे आणि त्याच्या सभोवती १२ उद्याने आहेत.
जिओडेसिक घुमट सोनेरी चकत्यांनी झाकलेला आहे आणि त्या सोनेरी चकत्या सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतात, त्यामुळे त्या संपूर्ण संरचनेला एक झळाळी प्राप्त होते.
मध्यवर्ती घुमटाच्या आत एक ध्यानकक्ष आहे ज्याला आतील कक्ष म्हणून ओळखले जाते - यामध्ये जगातील सर्वात मोठा ऑप्टिकली-परफेक्ट ग्लास ग्लोब आहे. मध्यवर्ती शांती क्षेत्रातील मातृमंदिर आणि त्याच्या सभोवतालची उद्याने, लोकांसाठी ठराविक काळात खुली केली जातात.
ध्यानकक्षाची रचना
संपादनश्रीमाताजींनी या ध्यानकक्षाची रचना सांगितली होती ती अशी : शंभर-दोनशे लोक सामावू शकतील एवढी त्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर, आतल्या बाजूला, (बाहेरून नव्हे) छताला आधार देणारे बारा स्तंभ असतील, आणि अगदी मधोमध, जिच्यावर चित्त एकाग्र करायचे अशी वस्तु असेल. आणि संपूर्ण वर्षभर, सूर्याने किरणांच्या रूपात आत प्रवेश करावा : ते प्रकाशाचे विकिरण (Diffusion) नसेल. सूर्याचा प्रवेश किरणांच्या रूपातच होईल, अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. त्यानंतर, दिवसाच्या घटिकेनुसार व वर्षातील महिन्याप्रमाणे, सूर्यकिरण फिरेल. दिशा बदलली तरीसुद्धा सूर्यकिरण थेट मध्यभागीच पडत राहतील अशा पद्धतीने त्यांना दिशा दिली जाईल.
श्रीमाताजींच्या कल्पनेनुसार ध्यानकक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. [१]
मध्यभागी जमिनीवर श्रीमाताजींचे प्रतीक आहे, त्याच्या मधोमध, चार भागांमध्ये एखाद्या चौरसाप्रमाणे, श्रीअरविंदांची चार प्रतीके आहेत. ती सरळ उभी केली आहेत आणि पारदर्शक पृथ्वीगोलाला तोलून धरलेले आहे. ध्यानाला आलेले साधक या रचनेवर चित्त एकाग्र करतात.
मातृमंदिराची प्रतीकात्मकता
संपादनश्रीमाताजी यांनी असे म्हणले आहे की, मनुष्याच्या पूर्णत्वप्राप्तीच्या अभीप्सेला, ‘ईश्वरा’ने दिलेल्या प्रतिसादाचे प्रतीक बनणे ही ‘मातृमंदिरा’ची मनिषा आहे. ‘ईश्वरा’शी झालेले ऐक्य, प्रगमनशील मानवी ऐक्याच्या रूपात अभिव्यक्त होत राहील.[१]
मातृमंदिराच्या संरचनेला आधार देणारे आणि आतील कक्ष तोलून धरणारे चार मुख्य खांब चार मुख्य दिशांना बसवले आहेत. हे चार स्तंभ श्रीअरविंद यांनी वर्णन केल्याप्रमाणे दिव्य मातेच्या चार पैलूंचे प्रतीक आहेत आणि या चार पैलूंवरून त्यांना नावे देण्यात आली आहेत.
(मातृमंदिर ज्या स्तंभावर उभारलेले आहे त्या चार स्तंभांचा अर्थ) | |
स्तंभ - दिशा | कशाचे प्रतीक? |
(दक्षिण स्तंभ) | महेश्वरी |
(उत्तर स्तंभ) | महाकाली |
(पूर्व स्तंभ) | महालक्ष्मी |
(पश्चिम स्तंभ) | महासरस्वती |
बारा पाकळ्यांमधील ध्यानकक्ष
मातृमंदिराच्या पायथ्याच्या सभोवती असलेल्या बारा कक्ष आहेत. तेथेही ध्यानासाठी आसनव्यवस्था आहे. या कक्षांना पुढील नावे दिलेली आहेत.
मन:पूर्वकता, विनम्रता, कृतज्ञता, चिकाटी, अभीप्सा, ग्रहणशीलता, प्रगती, धैर्य, चांगुलपणा, औदार्य, समत्व (समभाव), शांती.
बारा उद्याने व त्यांचे अर्थ
मातृमंदिराच्या सभोवती असणाऱ्या बारा उद्याने आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. : सत्, चित्, आनंद, प्रकाश, जीवन , शक्ती, ऐश्वर्य, उपयोगिता, प्रगती, तारुण्य, सुसंवाद, परिपूर्णत्व.[१]
मातृमंदिराला भेट देण्यासाठी
संपादन०१) ‘मातृमंदिर’ला भेट देण्यापूर्वी आधीऑरोविल येथे ‘व्हिजिटर्स सेंटर’ला जावे लागते.
०२) ‘मातृमंदिर’चे बाहेरून दर्शन घेण्याचा व्ह्यू पाँईंट आणि तेथील उद्यानांना भेट देण्यासाठी आवश्यक असणारे मोफत पास व्हिजिटर्स सेंटर येथे मिळतात.
०३) मातृमंदिरच्या ध्यानकक्षामध्ये (Inner chamber) मंगळवार आणि रविवार सोडून रोज सकाळी जाता येते.
०४) व्हिजिटर्स सेंटर पासून ‘मातृमंदिरा’च्या व्ह्यूईंग पाँईंट पर्यंत जाण्यासाठी १० ते १२ मिनिटे चालावे लागते. मात्र या संपूर्ण पाऊलवाटेवर लतावेलींची शीतल सावली आपली सोबत करते. परंतु ज्यांना हे सुमारे ०१ कि.मी. अंतर चालणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाची सुविधाही उपलब्ध आहे. मोफत बसची सुविधादेखील उपलब्ध आहे. [२]
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b c The Mother (1980). COLLECTED WORKS OF THE MOTHER. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.
- ^ "Visiting the Matrimandir | Auroville". auroville.org. 2024-02-24 रोजी पाहिले.