महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

स्थापना[]

संपादन

महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र. इमाव १०९६/प्र . क्र . ३९५ / विघयो - २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. कुविम २००६ / प्र. क्र. २८९ / विघयो - २, दिनांक २५ ऑगस्ट २००९ अन्वये १८/०६/२०१० रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) कोकण विभागा करिता महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली.

ओबीसी प्रवर्गातील बेरोजगारांना आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही व्यवसायांसाठी कमी व्याजदराने वित्त पुरवठा करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी स्वयंरोजगाराला चालना देताना ओ. बी. सी. प्रवर्गातील व्यक्तींनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी इतर योजना राबविणे ही पण उद्दिष्टे आहेत.

उद्दिष्टे[]

संपादन

१)राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय ( वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय या सारखे ) व्यापार किंवा उद्योग याची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे व त्यांचे संरक्षण करणे.

२)इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने, साधन सामुग्री आणि तांत्रिक आणि व्याव्स्थापिकीय साधने पुरवणे.

३)इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्या कडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून, त्यांचे कडून कामे यथायोग्यरीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.

४)राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती (ब्लू प्रिंट्स) तयार करणे, तयार करून घेणे, आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.

महामंडळाचे अधिकृत व वितरीत भाग भांडवल[]

संपादन

महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु. २५०.०० कोटी इतके असून, त्यापैकी मार्च, २०२१ पर्यंत शासनाकडून रु.१६१.५४ कोटी भागभांडवली अंशदान म्हणून प्राप्त झाले आहे. सदर रकमेमध्ये शासन कर्जमाफीची रु.४९.४९ कोटी इतकी रक्कम समाविष्ट आहे.

मुख्य कार्यालय[]

संपादन

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१

संचालक मंडळाची यादी []

संपादन
मा.मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, ३०१, मुख्य इमारत, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई-४०००३२ अध्यक्ष मा. मंत्री तथा अध्यक्ष
२. मा. अपर मुख्य सचिव / मा.प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. संचालक श्री. नंद कुमार ( भा. प्र. से.)

अपर मुख्य सचिव

३. मा. सहसचिव, कल्याण मंत्रालय, भारत सरकार, शास्त्री भवन, नवी दिल्ली.

३, सिरी इन्स्टिट्यूशनल एरिया, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली - ११० ०१६.

संचालक श्री. आर. पी. मिना

भा.पो.से

४. मा.व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ, ५ वा मजला, एन.सी.यु. आय बिल्डींग,३, सिरी इन्स्टिट्यूशनल एरिया, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली - ११० ०१६. संचालक श्री रजनिश कुमार जेनॉ
५. मा.संचालक,समाजकल्याण, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक श्री. सिद्धार्थ झाल्टे (अ.का.)
६. मा.व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,

प्रशासकीय भवन, ४ था मजला, आर.चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१.

संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रफुल्ल ठाकूर
७. मा.व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ९ , महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स लेन,

फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

संचालक डॉ. अजित देशमुख
८. मा.सहकार आयुक्त व निबंधक, नवीन मध्यवर्ती इमारत,२ रा मजला, सेंट्रल बिल्डींग,

महाराष्ट्र राज्य, पुणे - १.

संचालक श्री. अनिल कवडे

भा. प्र. से.

९. मा. अध्यक्षांव्यतिरिक्त शासन नियुक्त इतर ७ अशासकीय सदस्य संचालक अद्याप शासनाद्वारे इतर ७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d e "महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित".