ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेत फेकली जाते त्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ‘ह्’ हा महाप्राण आहे.

ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष्, स्’ या वर्णांत ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुद्धा महाप्राण म्हणतात. महाप्राण एकूण १४ आहेत.

मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना 'H' (एच) वापरावे लागते, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात, व बाकीच्यांना अल्पप्राण म्हणतात.

उदाहरण
  • ख् - KH (महाप्राण)
अपवाद
  • स् – S (महाप्राण)
  • च्Ch (अल्पप्राण)