महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मिती (इंग्लिश: Maharashtra State Power Generation Company Ltd. MAHAGENCO) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती करणारी संस्था आहे. महाजेनको द्वारे महाराष्ट्र राज्यात वीजनिर्मिती केली जाते. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या संस्थेनंतर ही दुसरी मोठी वीजनिर्मिती करणारी संस्था आहे. महाजेनको द्वारे महाराष्ट्र राज्यात विविध थर्मल पॉवर स्टेशन, गॅस टर्बाईन आणि हायड्रो पॉवर स्टेशन चालवले जातात.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महाजेनको, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

महाजेनको द्वारे वेळोवेळी भरती साठी जाहिरात प्रकाशित केल्या जातात. आई बी पी एस या बोर्डाद्वारे परीक्षा घेण्यात येतात.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "महाजेनको शासकीय कंपनीत रिक्त जागांसाठी भरती". MahaNews.[permanent dead link]

बाह्य दुवे संपादन