मस्तानी तलाव हा पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी (मृत्यू - इ.स. १७४०) हिचे नाव देण्यात आले आहे.

मस्तानी तलाव

ऐतिहासिक नोंद संपादन

भारत इतिहास संशोधक मंडळात सुमारे २५० वर्षांपू्र्वीच्या नोंदींचा एक कागद सांगतो की 'मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला' . यावरून मस्तानी येथे रहात असल्याने या तलावाला मस्तानी हे नाव पडले असे दिसते आहे. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर माधवराव पेशव्यांनी बांधले आहे. मात्र, शिव मंदिराची नोंद उपलब्ध नाही. नोंदीत लिहिलेली बाग आता अस्तित्वात नाही.

मस्तानी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, त्यात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. (सप्टेंबर २०१५ची माहिती).