दिवेघाट

(दिवे घाट या पानावरून पुनर्निर्देशित)

दिवेघाट हा पुणे-सासवड रस्त्यावर सह्याद्री पर्वत रांगेतील घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो. दिवेघाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला तलाव आहे. दंतकथेनुसार या तलावाला मस्तानी तलाव म्हटले जाते.