मार्यानो आंदुहार
(मरियानो अंदुजर या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्यानो गोन्झालो आंदुहार (स्पॅनिश: Mariano Gonzalo Andújar; ३० जुलै, १९८३ , बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला आंदुहार २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर आंदुहार २००९-१४ दरम्यान काल्सियो कातानिया तर २०१४ पासून एस.एस.सी. नापोली ह्या क्लबांसाठी खेळत आहे.