मराठी भाषा विभाग (महाराष्ट्र शासन)
मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत कार्यरत विभाग आहे. मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी विषयक कार्यालये/संस्था/मंडळ इत्यादींचे प्रशासकीय नियंत्रण मराठी भाषा विभागाच्या मार्फत होते. भारतात तसेच परदेशात मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी या विभागावर आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी भाषिकांना मोफत मराठीचे वर्ग उपलब्ध करून देतो. या विभागाचे उदय सामंत हे विद्यमान मंत्री आहेत.

![]() महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | |
Ministry अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र |
![]() |
मुख्यालय |
मराठी भाषा विभाग मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई |
वार्षिक अंदाजपत्रक | महाराष्ट्र शासन नियोजन |
जबाबदार मंत्री |
|
संकेतस्थळ | मराठी भाषा मंत्रालय |
खाते |
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दीपक वसंत केसरकर हे सध्या मराठी भाषा कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२]
कार्यालय
संपादनमहाराष्ट्रचे मराठी भाषा विभाग मंत्री महाराष्ट्र शासन Minister Marathi Language of Maharashtra | |
---|---|
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | मराठी भाषा विभाग मंत्री |
सदस्यता |
|
निवास | निवास, मुंबई |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई |
नामांकन कर्ता | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी |
|
निर्मिती | १ मे १९६० |
पहिले पदधारक |
|
उपाधिकारी | 29 जून 2022 पासून रिक्त |
महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्र्यांची यादी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर कोणत्याही मंत्र्यांकडे नसलेली खाती
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)
- उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, उत्पादन शुल्क
कॅबिनेट मंत्री आणि त्यांची खाती :
1) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2) राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
3) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
4) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
5) गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
7) गणेश नाईक - वन
8) दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9) संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
10) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12) उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13) जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
14) अदिती तटकरे - महिला व बालविकास
15) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
16) माणिकराव कोकाटे - कृषी
17) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
18) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
19) संजय सावकारे - कापड
20) संजय शिरसाट - सामाजिक न्याय
21) प्रताप सरनाईक - वाहतूक
22) भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन
23) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
24) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
25) आकाश फुंडकर - कामगार
26) बाबासाहेब पाटील - सहकार
27) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
28) पंकजा मुंडे - पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल
29) अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण
30) अशोक उईके - आदिवासी विकास
31) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
32) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
33) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ
राज्यमंत्री आणि त्यांची खाती :
1) माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
2) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
3) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
4) इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
5) योगेश कदम - गृहराज्य शहर
6) पंकजा भोयर - गृहनिर्माण
राज्यमंत्र्यांची यादी
संपादनप्रधान सचिवांची यादी
संपादनविभाग रचना
संपादनमंत्री (मराठी भाषा) हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री असतात. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतात. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग-१ चे ५ अधिकारी व वर्ग-२ चे८ अधिकारी असतात, एकूण ८ कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी असते.[३]
अंतर्गत विभाग
संपादन- मराठी भाषा विभाग
- भाषा संचालनालय
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
- राज्य मराठी विकास संस्था
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
पार्श्वभूमी
संपादनमराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि. २४ जून, २०१० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.[४]
कार्य
संपादन- मराठी भाषा विभागाशी (खुद्द) संबंधित तसेच मराठी भाषेच्या विकासासंबंधी शासनस्तरावरील सर्व कामे.
- भाषा संचालनालय व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
- राज्य मराठी विकास संस्था व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
- पाठयपुस्तके सोडून मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी कला या सर्व विषयांशी संबंधित उत्तम पुस्तकांना उत्तेजन देण्याकरिता पुस्तक निवड करणेबाबत. (पुस्तक निवड समिती) व अनुषंगिक बाबी.
- मराठी भाषा विकासासाठी धोरण ठरविणे
शक्ती प्रदत्त समिती
संपादननवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे.[५] सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.
- नवीन मराठी भाषा विभागामध्ये इतर संबंधित विभागातील कर्मचारीवृंद वर्ग करणे व आवश्यकतेनुसार नवीन पदे निर्माण करणे.
- नवीन विभागासाठी जागा, साधन सामग्री व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
- सचिवांसाठी मंत्रालयात जागा उपलब्ध करून देणे व वाहन खरेदी करण्यास मंजूरी देणे.
पद मंजूरी
संपादनमराठी भाषा विभागात अन्य विभागातील वर्ग होणारे विषय विचारात घेऊन विभागासाठी समितीने प्रथम 35 पदांना मंजूरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सा.प्र.विभाग दि.३१ जानेवारी, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक ६.९.२०११ रोजी सचिव कार्यालयासाठी ४ व विभागासाठी ६ अशा १० अतिरिक्त पदांना मंजूरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑक्टोबर, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच वाढीव कामकाज विचारात घेऊन आणखी अतिरिक्त ८ पदांना मंजूरी देण्यात आली असून त्याबाबत शा. नि. दि. २७/४/२०१२ रोजी निर्गमित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५३ मंजूर पदांपैकी 40 पदे भरण्यात आलेली असून उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. मराठी भाषा विभागात वर्ग करण्यात आलेले विषय व मंजूर कर्मचारीवृंद विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक ६ मे, २०११ दि. १४/११/२०११ व दि. २/५/२०१२ अन्वये विभागातील कामकाजासाठी ८ कार्यासने निर्माण करण्यात आली व कर्मचारीवृंदाचे वाटप करण्यात आले आहे. विभागासाठी नवीन प्रशासन भवनाच्या ८ व्या मजल्यावरील २४०० चौ.फू.च्या जागेचे वाटप माहे जुलै, २०११ मध्ये करण्यात आले असून, विभागाचे कामकाज सुरू झाले आहे.
पुरस्कार
संपादनस्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार
संपादनया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
अ) प्रौढ वाङमय विभागात २२ वाङ्मय पुरस्कार
ब) बालवाङ्मय विभागात ६ पुरस्कार
क) प्रथम प्रकाशन विभागात ६ पुरस्कार
ड) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र १ पुरस्कार
असे एकूण ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार लेखकांना प्रदान करते.
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
संपादनअ. क्र. | वर्ष | विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या साहित्यिकांची नांव |
---|---|---|
१ | २०१० | श्रीमती विजया राजाध्यक्ष |
२ | २०११ | श्री.के.ज.पुरोहित |
३ | २०१२ | श्री.ना.धो.महानोर |
४ | २०१३ | श्री.वसंत आबाजी डहाके |
५ | २०१४ | श्री.द.मा.मिरासदार |
६ | २०१५ | प्रा.रा.ग.जाधव |
७ | २०१६ | श्री.मारुती चितमपल्ली |
८ | २०१७ | श्री. मधु मंगेश कर्णिक |
९ | २०१८ | श्री. महेश एलकुंचवार |
१० | २०१९ | श्रीमती अनुराधा पाटील |
११ | २०२० | प्रा. रंगनाथ पठारे |
१२ | २०२१ | श्री. भारत सासणे |
श्री.पु.भागवत पुरस्कार
संपादनमराठी भाषेतील उत्कृष्ट प्रकाशकास २००८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०१६चा श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट पुरस्कार भारतीय विचार साधना, पुणे यांना जाहीर.
अधिकृत संकेतस्थळ
संपादन- https://marathi.gov.in/ Archived 2025-02-27 at the Wayback Machine.
- https://sahitya.marathi.gov.in/235/ Archived 2022-03-02 at the Wayback Machine.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
- ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
- ^ "संग्रहित प्रत". 2017-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-09 रोजी पाहिले.
- ^ सदर निर्णयास अनुलक्षून स्वतंत्र मराठी भाषा विभागाच्या स्थापनेबाबत आदेश शासन निर्णय, सा.प्र.विभाग क्र.मभावा-210/458/प्र.क्र.95(भाग-2)/20-ब, दि.22 जुलै, 2010 अन्वये निर्गमित करण्यात आले असून याबाबतची अधिसूचना दि.29 नोव्हेंबर, 2010 रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
- ^ शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.शप्रस-2010/प्र.क्र.116/20-ब, दि.14 जुलै, 2010 व दि.10 ऑगस्ट, 2010 अन्वये