ममता चंद्राकर या छत्तीसगडच्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त लोकगायिका आहेत.[२] यांचा जन्म ३ डिसेंबर १९५८ रोजी झाला. त्यांना छत्तीसगडची कोकिळा(नाइटिंगेल) म्हणून संबोधले जाते.[३][४] ममता चंद्राकर यांनी इंदिरा कला संगीत विद्यापीठातून गायनाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.[५] ममता चंद्राकर यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून गायला सुरुवात केली. १९७७ मध्ये आकाशवाणी केंद्र रायपूरमधून व्यावसायिकपणे लोकगायिका म्हणून काम केले. त्यांच्या कामासाठी २०१६ मध्ये ती पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पती प्रेम चंद्राकर हे छत्तीसगडच्या फिल्म इंडस्ट्रीमधील निर्माता आणि दिग्दर्शक आहेत.

ममता चंद्राकर
जन्म ३ डिसेंबर, १९५८ (1958-12-03) (वय: ६५)
दुर्ग, छत्तीसगड, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
टोपणनावे मोक्षदा चंद्राकर
पेशा कुलपती, इंदिरा कला संगीत विश्व विद्यालय, खैरागड, सहाय्यक. दिग्दर्शक ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी रायपूर, पार्श्वगायक, छत्तीसगढ़ी लोक गायक
कार्यकाळ १९६८ पासून
जोडीदार प्रेम चंद्राकर
अपत्ये पूर्वी चंद्राकर
वडील दाऊ महासिंग चंद्राकर
आई गयाबाई चंद्राकर
नातेवाईक डॉ. बी.एल.चंद्राकर (भाऊ)
प्रमिला चंद्राकर (बहीण)
पुरस्कार

प्रारंभिक जीवन संपादन

ममता चंद्राकर यांचा जन्म १९५८ मध्ये श्री डाऊ महासिंग चंद्राकर यांच्या घरी झाला. त्यांना स्वतःला लोकसंगीताचे सखोल ज्ञान होते.[६] ज्या काळात बॉलीवूड संगीताचा स्थानिक लोकसंगीतावर प्रभाव पडत होता, तेव्हा त्यांनी १९७४ मध्ये "सोन्हा-बिहान" नावाची कंपनी सुरू केली. लोकसंगीताचा आत्मा लोकांच्या हृदयात आणि मनात जिवंत ठेवणे हा सोन्हा-बिहान कंपनीचा उद्देश होता. या विचाराने सोन्हा-बिहानने मार्च १९७४ मध्ये चाळीस ते पन्नास हजार लोकांसमोर सादरीकरण केले. दिवंगत दाऊ महा सिंह यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसंगीताच्या प्रसारासाठी समर्पित केले. ममता चंद्राकर यांनी सुरुवातीचे धडे स्वतः वडिलांकडून घेतले. त्यानंतर संगीताच्या पुढील शिक्षणासाठी तिने इंदिरा कला संगीत विद्यापीठात प्रवेश घेतला. १९८६ मध्ये, तिने छत्तीसगढ़ी सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता प्रेम चंद्रकर यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला १९८८ मध्ये एक मुलगी झाली.[४]

पुरस्कार संपादन

  • २०१९ मध्ये छत्तीसगड विभूती अलंकरण [७]
  • २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार [८]
  • २०१३ मध्ये छत्तीसगड रत्न [९]
  • २०२१ मध्ये डाॅ दुलार सिंग मंद्राजी सन्मान

संदर्भ संपादन

  1. ^ "Mamta Chandrakar gets Honours from the Govt. Culture Dept. of Chhattisgarh". 26 Jan 2016. Archived from the original on 15 March 2018. 15 March 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Mamta Chandrakar". cgkhabar. 26 Jan 2016. 2016-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ Experts, Disha (5 August 2017). The PADMA ACHIEVERS 2016. ISBN 9789385846649. 2019-03-10 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Mamtha Chandrakar". veethi.com. 2019-03-10 रोजी पाहिले.
  5. ^ "TOP FEMALE FOLK SINGERS OF INDIA". wegotguru.com. Archived from the original on 2020-09-25. 2019-03-10 रोजी पाहिले.
  6. ^ "Smt. Mamta Chandrakar – Folk Singer" (PDF). CEO Chhattisgarh. 10 September 2012.
  7. ^ "Chhattisgarh Vibhuti Alankaran". CG News. 2018.
  8. ^ "Padma Shri Award to Mamta Chandrakar". Jagran. 25 Jan 2016.
  9. ^ "Chhattisgarh Ratna". Facebook. 20 Dec 2013.