मनीषा कोइराला

नेपाळी अभिनेत्री (जन्म १९७०)
(मनिषा कोइराला या पानावरून पुनर्निर्देशित)

मनीषा कोइराला (१६ ऑगस्ट, इ.स. १९७०; काठमांडू, नेपाळ - हयात) ही नेपाळी-भारतीय चित्रपट-अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच ती भरतनाट्यम्मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे.

मनीषा कोइराला
जन्म १६ ऑगस्ट, इ.स. १९७०
काठमांडू, नेपाळ
इतर नावे मनीषा कोइराला-दहल
राष्ट्रीयत्व नेपाळी
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
सामाजिक कार्य
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८९ - चालू
भाषा नेपाळी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
पती सम्राट दहल (इ.स. २००० -चालू)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

तिने इ.स. १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. इ.स. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२: अ लव्ह स्टोरी, बॉंबे, खामोशी: द म्यूझिकलदिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले.

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2013-05-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मनीषा कोइराला चे पान (इंग्लिश मजकूर)