मनामा

बहरीनची राजधानी आणि सर्वात मोठे शहर

मनामा (अरबी: المنامة) ही पश्चिम आशियामधील बहरैन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मनमा शहर बहरैन बेटाच्या उत्तर भागात इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. १९२१ सालापर्यंत बहरैनची राजधानी जवळील मुहर्रक येथे स्थित होती. विसाव्या शतकामध्ये खनिज तेल विक्रीमुळे बहरैनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली व मनामा हे देशाचे आर्थिक व वाणिज्य केंद्र बनले. ह्याकारणास्तव १९२१ साली राजधानी मनामाला हलवण्यात आली.

मनामा
المنامة
बहरैन देशाची राजधानी


मनामा is located in बहरैन
मनामा
मनामा
मनामाचे बहरैनमधील स्थान

गुणक: 26°13′N 50°35′E / 26.217°N 50.583°E / 26.217; 50.583

देश बहरैन ध्वज बहरैन
क्षेत्रफळ ३० चौ. किमी (१२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,५७,४७४
  - घनता ५,२०० /चौ. किमी (१३,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.capital.gov.bh


२०१२ साली मनामाला अरब लीगने अरबी सांस्कृतिक राजधानी घोषित केले होते.

वाहतूक संपादन

गल्फ एअरचा प्रमुख वाहतूकतळ असलेला बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ मनामापासून ७ किमी अंतरावर स्थित आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: