मधुकर सरपोतदार
भारतीय राजकारणी
मधुकर सरपोतदार (जानेवारी ३१, इ.स. १९३६ - फेब्रुवारी २०, इ.स. २०१०) हे मराठी राजकारणी होते. ते शिवसेनेचे नेते होते. शिवसेनासदस्य असताना ते महाराष्ट्र विधानसभेवर व लोकसभेवर निवडून गेले होते.
राजकीय कारकीर्द
संपादनसरपोतदार इ.स. १९९० साली महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. ते इ.स. १९९६ व इ.स. १९९८, असे दोन वेळा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडले गेले. त्यांनी लोकसभेतील शिवसेना संसदीय गटनेतेपदही सांभाळले.