मच्छिंद्रनाथ गड हे बिड जिल्ह्यातील जागृउत देवस्थान आहे. येथे श्री मच्छिंद्रनाथ यांची संजीवनी समाधी आहे. हे संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र मायंबा, जिल्हा बीड, महाराष्ट्र येथे स्थित आहे. मच्छिंद्रनाथ हे नऊ नाथापैकी एक" त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथजी होय . श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्र " हे नाम धारण केले . श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. मच्छिंद्रनाथ गड येथे मच्छिंद्रनाथ समाधी आहे. नगर व बीड् जिल्ह्यात नवनाथ स्वामींच्या अनेक समाध्या आहेत. उदा. वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव हरंगुळ गावी भर्तृहरीनाथांचे भव्य संजीवन समाधी मंदिर आहे.

मार्ग

संपादन
  • नगर- पाथर्डी > निवडुंगे गाव > मढी गाव > मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे.
  • नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे.
  • नगर - चिचोंडी पाटील - देवळा - बीड या मार्गावरून रस्ता आहे.
  • नगर - म्हसोबाचीवाडी फाटा - गहुखेल - मायंबा