श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छिंद्रनाथ जी होय . श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मच्छिंद्र " हे नाम धारण केले . श्री मच्छिंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते.[ संदर्भ हवा ] मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.[ संदर्भ हवा ]
आद्यनाथाचार्य चैतन्य श्री मत्स्येंद्रनाथ जी
|
|
धर्म:
|
हिंदू,
|
- आद्य नाथाचार्य चैतन्य श्रीमत्स्येंद्रनाथजी संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान, सावरगाव, (ता. आष्टी, जि. बीड, महाराष्ट्र)414203
- मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, औरंगाबाद, महाराष्ट्र
- मच्छिंद्रनाथ मंदिर वढोदा.ता.मुक्ताईनगर.जि.जळगांव 425327
- मच्छिंद्रनाथ मंदिर, कीलेमच्छिंद्र गड ता.वाळवा जि.सांगली
- मच्छिंद्रनाथ मंदिर म.चिंचोली ता.घनसावंगी जि.जालना 431209
- श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ मंदिर सुपेधर ता.आंबेगाव जि.पुणे 410509