मंगला बर्वे
मंगला अच्युत बर्वे (इ.स. १९२७ - २३ ऑक्टोबर, इ.स. २०१६:दादर, मुंबई , महाराष्ट्र) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांनी पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन पाककृती निर्माण केल्या. त्यांनी अन्नपूर्णा सहित पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांच्या अन्नपूर्णा पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
बर्वे यांची कोशिंबिरी सह अनेक पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.
बर्वे ह्या गाथासप्तशतीचे संपादक सदाशिव अात्माराम जोगळेकर ह्यांच्या कन्या होत्या. बर्वे यांचे पती अच्युत बर्वे हे एक मराठी लेखक होते.
पुस्तके
संपादन- अन्नपूर्णा
- आरोग्यदायक फळे आणि पदार्थ
- उपवासाचे पदार्थ
- एक सायंकळ एक पदार्थ
- ओव्हन त्रिविधा पाककृती
- काही तिखट काही गोड
- कोशिंबिरी
- चायनीस पदार्थ
- डाळी, कडधान्ये, रव्याचे पदार्थ
- डोहाळे बारसे, रूखवताचे पदार्थ
- दिवाळीचे व सणासुदीचे पदार्थ
- २०२ भात व भाज्या शाकाहारी
- न्याहरी आणि अल्पोपाहार
- पालेभाजी खासियत
- पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी
- फ्रिज, मिक्सर
- बटाट्याचे पदार्थ
- मांसाहारी इच्छाभोजन
- लाडू स्पेशल
- लोकरीने विणून केलेली खेळणी
- वर्षाचे सणवार
- विवाह सोहळा व रुखवताचे पदार्थ
- सॅलड्स
- साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या