भूपेश बघेल ( २३ ऑगस्ट १९६१) हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. १९९३ सालापासून पाटण मतदारसंघामधून निवडून येणारे बघेल छत्तीसगढ प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर देखील होते.

भूपेश बघेल
Bhupesh Baghel, June 2018.jpg

विद्यमान
पदग्रहण
१७ डिसेंबर २०१८
राज्यपाल अनुसुया उईके
मागील रमण सिंह

जन्म २३ ऑगस्ट, १९६१ (1961-08-23) (वय: ६०)
दुर्ग, मध्य प्रदेश,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

२०१८ छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीमध्ये बघेल ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. १७ डिसेंबर २०१८ रोजी बघेल ह्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.