भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता अदीपराशक्ति. भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवनेश्वरी.या भूमीच्यासृजनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई. भूमी आणि परमप्रकृतिस्वरूपा पार्वती मातेचा सर्जनोत्सव.अस मानल्या जात की पार्वती भिलींणिच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवासोबत माहेरी येते.माहेरच्या लोकांसोबत भेट घेते आणि सम्पूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्हासीत करते.मुलीच्या आगमनाने आई वडील आणि सगळे माहेरचे आनंदाने भारावरून जातात आणि याला एक उत्सवाप्रमाणे साजरा करतात.तिच्यासाठी विविध पक्वान्न आणि खेळल्या जातात. एक माहेरवाशिणीच्या आगमनासाठी म्हणून शिवशक्तीची ही पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे सदाशिवशंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शिवशंकराची फक्त हजेरी असते.अगदी एका जावई प्रमाणे. भुलाबाईच्या पूजनात श्री. वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्ती संप्रदाय यांच्या खुणा दिसतात.

भुलाबाई म्हणजेच परब्रह्मस्वरुपिणि देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात. पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पूर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे.


भाद्रपद पौर्णिमा (सहसा अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस) ते आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात.

    भोडनीचा सण, मातेचे गुणगान" या लेखातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार हादगा आणि भोंडला हे पर्जन्योत्सव असून; "पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय', "भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी', "भुलाबाई राणीचे डोहाळे', "तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी', "चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू', "पाचाचा पाळणा, बाळ नेता हनुमंता, हनुमंताची निळी घोडी, येता जाता कंबळतोडी' अशी मातृत्वाबाबतची वर्णने गीतातून गाणाऱ्या भुलाबाई उत्सवाचा उद्देश मातृपूजा आणि मातृत्व गौरव असून भुलाबाईचा सोहळा हादगा आणि भोंडला ह्या पासून वेगळा असलेला एक सर्जनोत्सव आहे. डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार अशा भुलाबाई गीतांच्या माध्यमातून आदिम समाजजीवनातील सुफळीकरणाचे रुढीअवशेष या उत्सवातून दिसून येतात. 

भुलाबाई उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा या साप्ताहिक लोकप्रभातील लेखातून संतोष विणके कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विदर्भातील शेतकरी ज्वारीच्या धांड्यांनी अथवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यात भुलाबाईस बसवतात तसेच या काळात खरिपाची पिके कापणीला येतात याचा निर्देशकरून भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पुजनासाठी असल्याचे सुचवतात.

भुलाबाईचे गाणे- १.भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलीना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला
चला हो माझ्या माहेरा ,माहेरा.. गेल्याबरोबर पाट बसायला ताट जेवायला विनंती करू यशोदेला टीप-या खेळू , गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ, घरी जाऊ..

२.साखरेच्या गोणीबाई लोटविलया अंगणी
आज आमच्या भुलाबाईला पहिला दिवस..पहिला दिवस

३.बारशाच्या वेळेला बाळाचे नाव ठेवताना गाणे म्हणतात- अळकित जाऊ की खीळकित जाऊ
खीळकित ठेवली माती
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा गणपती
आडकीत जाऊ खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुई,
भुलाबाईला लेक झाली,
नाव ठेवा जुई...

गणपती विसर्जनानंतर दूसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा ते आश्विन शुद्ध पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत भुलाबाई उत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो . भुलाबाई भुलोजी हे शंकर पार्वतीचे स्वरूप आहे . विद्या अभ्यासाची प्रगती व्हावी, शंकरा ( महादेव ) सारखा पती मिळावा, मुलींना खेळायला मिळावे, मैत्रिणींच्या संगतीत सहजीवन जगता यावे , मनसोक्त हसण खिंदळणं शक्य व्हाव म्हणून पुरातन काळा पासून विशेष करून खानदेश व विदर्भातील मुलींचा हा उत्सव साजरा करण्यात येतो . व अश्विन शुद्ध पौर्णिमेला ( कोजागीरी ) या उत्सवाची सांगता होते .

गुलाबाई -गुलोजी हे शिव आणि पार्वतीचे रूप आहे . आणि पूर्वीच्या काळी स्त्रिया हा सण साजरी करत असत आता ह्या सणाला फारसे साजरी करतांना दिसत नाही . आज आपण मुली आणि स्त्रिया यांच्या ह्या सणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत . र्वीच्या काळी हा सण संपूर्ण महिनाभर साजरी केला जायचा . म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला सुरू होऊन तो अश्विन पौर्णिमा पर्यंत हा सण सुरू असायचा. ह्या सणासाठी विशेष मातीच्या मुर्त्या विकायला यायच्या . ह्या मूर्त्यांना कुणी गुलाबाई – गुलोजी तर कुणी भुलाबाई – भुलोजी असे म्हणतात .

ह्या मूर्ती मध्ये एका बाजूला नव्वारसाडी आणि साज घातलेली गुलाबाई म्हणजेच पार्वती बसलेली असते आणि तिच्या मांडीवर बाळ असते . तर दुसऱ्या बाजूला गुलोजी बसलेले असतात . त्यांन चा ही कुर्ता आणि धोतर व फेटा असा पेहराव असतो . अशी ही भुलाबाई आणि भुलोजी ची मूर्ती असते पूर्वीच्या काळी हा सण संपूर्ण महिनाभर साजरी केला जायचा . म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला सुरू होऊन तो अश्विन पौर्णिमा पर्यंत हा सण सुरू असायचा. ह्या सणासाठी विशेष मातीच्या मुर्त्या विकायला यायच्या . ह्या मूर्त्यांना कुणी गुलाबाई – गुलोजी तर कुणी भुलाबाई – भुलोजी असे म्हणतात .

पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि मुली दोघांना कामातून वेळ मिळाला कि त्या एकत्र येऊन ह्या देवी पार्वती आणि शिव म्हणजेच गुलाबाई आणि गुलोजी च्या रूपात त्यांचे स्मरण, आराधना करीत असेत .

त्याच बरोबर पूजेच्या वेळी वेग – वेगळी खेळ खेळीत असत आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातील बोल ,तळमळ ही व्यक्त करीत असत . तेवढा च त्यांना देवीच्या नामस्मरण सोबत करमणूक होत असे .

आणि त्याच बरोबर त्यांना उघड -उघड सासरच्या मंडळींना बोल लावता येत नसे म्हणून त्या स्वतः हा काही ओव्या तयार करून त्यांना बोल लावीत असत . आणि ह्या सणानिमित्त सर्व सखी, मैत्रिणी एकत्रित येऊन एका ठिकाणी गोळा होउंन गाणी खेळ खेळीत असत .

तसेच अजून एक पौराणिक कथा सुद्धा ह्या सनाबद्दल आहे . ती अशी आहे कि एकदा शिव- पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते . तेव्हा शिव ह्या खेळात हरतात आणि पर्वती जिंकते . त्यामुळे शंकरजी पर्वतीवर रुसून तेथून निघून जातात.

त्यानंतर पार्वती शंकराचा राग शांत करण्यासाठी आणि त्यांचा रुसवा घालवण्यासाठी पार्वती एका भिल्ल महिलेचे रूप धारण करते आणि शंकराच्या समोर जाते , तेव्हा शंकर पार्वतीच्या ह्या धारण केलेल्या रूपाला भुलतात म्हणून शंकराला भुलोजीराना , भुलोबा, असे म्हणतात .

श्रावण महिन्यानंतर हा Bhulabai- Bhuloji किंवा गुलोजी, गुलाबाई हा सण स्त्रिया शिव पार्वतीचे प्रतीक म्हणून साजरी करतात .

तसेच महिनाभर हा सण खूप आनंदाने गाणी गात ,वेगवेगळी खेळ खेळीत साजरी केला जातो . आणि ह्या सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेला ह्या सणाचे सर्व जण मिळून रात्रभर जागरण करतात . त्यात ते सर्व स्त्रिया त्यांच्या भुलाबाईची मूर्ती एकत्र एका ठिकाणी अंगणात पाटावर किंवा टेबलावर मांडतात.

आणि रात्रभर गाणी आणि खेळ खेळतात . त्याच्य बरोबर कोजागिरी असल्याने त्या रात्री त्या दूध आटवतात . कारण चंद्राचे पावित्र्य त्या दुधात पडून त्यांना चंद्राचा आशीर्वाद आणि चंद्रासारखी शीतलता त्यांना प्राप्त व्हावी. म्हणून कोजागिरीला गुलाबाईचे जागरण करतात.

आणि दुधासोबत खाऊ म्हणजेच नैवद्य स्वरूपात वेणी,फणी,शंकरपाडी अशी इतर खाद्यपदार्थ बनवतात आणि एकत्रित वाटून खातात . आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नदीवर जाऊन एकवेळा त्या मूर्तीची पूजा आणि आरती करतात व नैवद्य देतात आणि मूर्तीचे विसर्जन करतात . अश्या रीतीने हा सण साजरी केला जातो.

गणपती विसर्जनानंतर दूसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा ते आश्विन शुद्ध पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत भुलाबाई उत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो . भुलाबाई भुलोजी हे शंकर पार्वतीचे स्वरूप आहे . विद्या अभ्यासाची प्रगती व्हावी, शंकरा ( महादेव ) सारखा पती मिळावा, मुलींना खेळायला मिळावे, मैत्रिणींच्या संगतीत सहजीवन जगता यावे , मनसोक्त हसण खिंदळणं शक्य व्हाव म्हणून पुरातन काळा पासून विशेष करून खानदेश व विदर्भातील मुलींचा हा उत्सव साजरा करण्यात येतो . व अश्विन शुद्ध पौर्णिमेला ( कोजागीरी ) या उत्सवाची सांगता होते .

साधी असते पुजा

भुलाबाई भुलोजींच्या मुर्तिची स्थापना घरातल्या देवडीत साध्या पद्धतीने केली जाते . सायंकाळी गल्लीतल्या मुली, मैत्रीणी टिपऱ्या घेऊन भुलाबाई भुलोजी जी गाणी म्हणतात . यात पहिली ग भुलाबाई देवा देवा सांजे, येथून दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी, सा बाई सूं बेलाच्या झाडाखाली महादेवा तू , अडवणि की गोडवणी दुधा खालचं धारवणी, एवढीशी गंगा झुळु झुळू वाहे, आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, हककुंड बाळा हककुंड बाळा या सह सुंदर चालींवर व टिप- यांच्या निनादात गाणी म्हटली जातात . आरती केली जाते .

खाऊ ओळखण्याची स्पर्धा

आरती नंतर प्रसाद ( खाऊ ) म्हणून झाकलेला पदार्थ उपस्थित मुलींना ओळखावा लागतो. कोजागिरी पौर्णिमेस भुला बाई भुलोजींच्या मुर्ति अंगणात चौरंग , पाटावर ठेवून सजावट करून ठेवतात . यावेळी गोड दुधासह विविध मिठाई , पदार्थांचे नैवेद्य दाखवले जाते प्रति दिवसा प्रमाणे गाणी, आरती व रात्र जागरण मुली व महिला करतात. याच बरोबर भुलाबाई उत्सवाची सांगता होते .

हे सुद्धा पहा

संपादन


संदर्भ आणि नोंदी

संपादन