भिंगार
नगरजवळ भिंगार येथे कॅन्टॉनमेंट बोर्ड (लष्करी छावणी) आहे. तेथे ब्रिगेडियर पातळीवरील अधिकारी बोर्डाचा प्रमुख म्हणून कार्यरत असतो. समाजसेवक अण्णा हजारे यांचे आजोबा भिंगार गावी सैन्यात नौकरी करत. अण्णा हजारे यांचा जन्म भिंगार गावी झाला.
इतिहास
संपादनमहानुभाव पंथीय संत श्रीचक्रधरस्वामी पूर्वार्धात शके ११९२ पौष वैद्य द्वादशीला भिंगारला आले. माघ शुद्ध द्वादशीपर्यंत येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर उत्तरार्धात ११९५ मध्ये मार्गशीर्ष वद्य द्वितीया ते मार्गशीर्ष सोमवती अमावस्येपर्यंत असे ३५ दिवस ते परत भिंगारला राहिले.[१]. लिळाचरित्रातील उल्लेखानुसार चक्रधरस्वामींचे ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणी पूर्वी आदित्याचे (सूर्यनारायण) मंदिर होते. त्या मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीला लागून पूर्व-पश्चिम ओटा होता. त्या ओट्यावर स्वामींचे बसणे, उठणे, भोजन, निरूपण आदि कार्य केले जायचे. हा ओेटा मुख्य पूजनीय स्थान मानले जाते. येथील अंगणातील स्नान करण्याच्या स्थानासह पाच स्थाने पूजनीय मानली जातात [१]
संदर्भ
संपादन- ^ a b स्वामी भगवान श्रीकृष्णांचे पाचवे अवतार आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामींचे भिंगारला वास्तव्य-बाळासाहेब शेटे Archived 2012-01-18 at the Wayback Machine., हे संकेतस्थळ दिनांक २४ ऑगस्ट २०११ भाप्रवे रात्रौ २०.१५ वाजता जसे दिसले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |