भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील चलचित्रपट विषयक तरतुदी

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये चलचित्रपट हे एक काम आहे (२(y)), या कायद्यातील व्याख्येनुसार, "चलचित्रपट म्हणजे दृक मुद्रणाचे कोणतेही काम आणि अशा दृकमुद्रणासोबत ध्वनीमुद्रणाचा समावेश असेल आणि कोणत्याही समकक्ष प्रक्रीयेने निर्मित कोणतेही काम ज्यात व्हिडीओ पटाचाही समावेश असेल तेही चलचित्रपट समजले जाईल."(2(f)) चलचित्रपट कामाच्या निर्मितीसाठी पुढाकार आणि जबाबदारी घेणारी व्यक्ती निर्माता म्हणवली जाते.(२ (uu)), चलचित्रपटाचा निर्माता ह्या कायद्यासाठी लेखक म्हणवला जातो (२(d)(v)), सहसा हा लेखकच (म्हणजे प्रत्यक्षात चलचित्रपटाचा निर्माता) हाच चलचित्रपटाचा पहिला मालक म्हणवला जातो (१७), परंतु (इतर विशेष कराराचा अभाव असेल तर) (शासननियंत्रीत/नियुक्त) सार्वजनिक उपक्रम अथवा शासनाने बनवुन घेतलेल्या चलचित्रपटांचे पहिले मालक तेच ठरतात,(१७(d)आणि(dd)) किंवा (इतर विशेष कराराचा अभाव असेल तर) शिकाऊ उमेदवारी आणि सेवा करारांतर्गतची नौकरी दरम्यान निर्मीत(१७ (c)) अथवा वृत्तसंस्थेतील नौकरी दरम्यान वृत्तसंस्थेतील प्रकाशनासाठी(१७ (a)) केलेल्या चलचित्रपटाची पहिली मालक संबंधीत संस्था असते, आणि एखाद्या व्यक्तीने पैसे देऊन चलचित्रपट निर्मिती करवून घेतल्यास पहिली मालक पैसे देऊन बनवून घेणारी व्यक्ती ठरते.(१७ b).

चलचित्रपटाचा महत्त्वपुर्णभाग दुसऱ्या कोणत्याही कामाचे प्रताधिकार उल्लंघन(51Explanation) असल्यास त्यात प्रताधिकार विद्यमान होऊ शकत नाही (13(3)) , अन्यथा चलचित्रपटासाठी संपूर्ण भारतात प्रताधिकार विद्यमान राहतो.(१३(1)(b)) चलचित्रपटातील प्रताधिकार विद्यमानतेचा कालावधी, चलचित्रपट प्रकाशित झालेले कॅलेंडरवर्ष अधिक साठवर्षे एवढा असतो.(२६) भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १४ (a) प्रताधिकार विद्यमान असलेल्या कामांसाठी लेखकास (या कायद्यातील व्याख्येनुसार चलचित्रपट निर्मात्यास) काही विशेषाधिकार प्रदान करते.(१४ (a)) तर कलम १४ (d) (i) अन्वये चलचित्रपटास इलेक्ट्रॉनीक अथवा इतर माध्यमातून जतन करण्याचे (१४(d)(i)(B)), चलचित्रपटाच्या कोणत्याही भागाच्या प्रतिमेपासून छायाचित्र बनवण्यासहीत(१४(d)(i)(A), चलचित्रपटाची प्रत बनवण्याचे विशेषाधिकार चलचित्रपट निर्मात्याकडे असतात.(१४ (d) (i))

4[(f) "cinematograph film" means any work of visual recording [***][6thAmnd १] and, includes a sound recording accompanying such visual recording and "cinematograph" shall be construed as including any work produced by any process analogous to cinematography including video films;]
  1. ^ omitted "on any medium produced through a process from which a moving image may be produced by any means" by Act 27 of 2012, w.e.f. 8th June, 2012

रॉयल्टी (स्वामीत्वधन) विषयक तरतुद

संपादन

२०१२ च्या विशोधन (अमेंडमेंट) कायद्यातील समाविष्ट केलेल्या माध्यमातून चलचित्रपटांमध्ये समाविष्ट कलाकार आणि उपकलाकृतींच्या लेखकांना रॉयल्टी (स्वामीत्वधन) प्राप्त होत राहण्याचे प्रताधिकार कालावधीत स्थायी अधिकार प्राप्त होतात.[]

आयकर विषयक तरतुद

संपादन

Income-Tax Act, 1961 खालील करमाफी असलेल्या, ना-नफा तत्त्वावरील शैक्षणिक संस्थेसाठी अथवा ना-नफा तत्त्वावरील वाचनालयासाठी ना-नफा उद्दीष्टाने चलचित्रपटाच्या अधिकृतरित्या प्राप्त आवृत्तीच्या लीज अथवा देण्यासाठी मिळणारे भाडे हे व्यापारी भाडे समजले जाणार नाही. (२.(fa))


रास्त वापर (Fair Deal)

संपादन

(चलचित्र)पटाच्या मुख्य गाभ्याच्या प्रसंगवशात अथवा पार्श्वभूमीत आलेले 'कलात्मक काम' आणि सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक लोकांना उपलब्ध ठिकाणी काययम स्वरूपी उपलब्ध 'कलात्मक काम' चलचित्रपटासाठी रास्तवापर समजले जाते (52(u)(i)&(ii)); तर शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी, शैक्षणिक संस्थेच्या मर्यादीत श्रोतृवर्गापुढे उद्देशून केलेले चलचित्रपटाचे दाखवणे हा रास्तवापर समजला जाऊ शकतो. (52 ( j ))

न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास

संपादन
  • उत्तरदायकत्वास नकार लागू
क्रमांक केस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत माननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय वर्ष कायदा आणि कलम
(आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर
(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत)
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन