भारतीय ऑलिंपिक संघ (Indian Olympic Association) ही भारत देशामधील एक खेळ संघटना आहे. भारत देशाचे खेळाडू ऑलिंपिक स्पर्धा, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ इत्यादी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाठवण्याची जबाबदारी ह्या संघटनेकडे आहे.

भारतीय ऑलिंपिक संघ
Indian Olympic Association logo.svg
लोगो
राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
देश भारत ध्वज भारत
संकेत IND
स्थापना इ.स. १९२७
खंडीय संघटना ओ.सी.ए.
मुख्यालय ऑलिंपिक भवन, नवी दिल्ली
अध्यक्ष एन. रामचंद्रन
कार्यकारी सचिव राजीव मेहता
संकेतस्थळ olympic.ind.in

१९२७ साली स्थापन झालेल्या आय.ओ.ए.ला भ्रष्ट्राचारी पदाधिकारी नेमल्याबद्दल ४ डिसेंबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निलंबित केले होते. ह्यामुळे २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना भारताच्या ध्वजाऐवजी ऑलिंपिकचा ध्वज वापरून सहभागी व्हावे लागले होते. परंतु आय.ओ.ए.ने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतलेली निवडणुक योग्य असल्यामुळे आय.ओ.सी.ने भारताचे निलंबन ११ फेब्रुवारी २०१४ रोजी मागे घेतले.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा