भातसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?भातसई

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शहापूर
जिल्हा ठाणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

भातसई हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीशेजारी वसलेले एक छोटसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम १५०० च्या आसपास आहे. गावातील एखाद्या कुटुंबाचा अपवाद वगळता येथे फक्त आगरी समाजाचे लोक राहतात.गावापासून फक्त २.५ किमीच्या अंतरावर वासिंद हे मध्यरेल्वेचे स्थानक आहे. तसेच ३ किमीच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ आहे. त्यामुळे गावापासून मुंबईकडे वा नाशिककडे प्रवास करणे सोपे आहे. भातसई ते मुंबई हे अंतर ८३ किमी असून रेल्वेमार्गाने हा प्रवास अडीच तासात शक्य होतो.

हवामान

संपादन

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

नैसर्गिक महत्त्व

संपादन

भातसई गाव हे नदीशेजारी वसले असल्याने नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. नदीप्रवाहाच्या वरच्या बाजूला भातसा हे धरण असल्यामुळे नदी वर्षभर भरून वाहते. त्यामुळे याच पाण्याचा वापर शेतीसाठी करून येथील शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. भातसा कालव्यापासूनसुद्धा शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने काही शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. गावाच्या पूर्वेकडे काही जंगले आहेत, त्यांमध्ये पासाणचा रान व शेर्याचा रान ही जंगले प्रमुख आहेत. गावाशेजारी नदी व भोवताली जंगल असल्याने येथील वातावरण हे शांत व उत्तम आहे .

व्यवसाय

संपादन

भातसई गावच्या लोकांचा परंपरागत व्यवसाय हा शेती असला तरी आताची पिढी मुंबई, ठाणे या सारख्या महानगरांमधे नोकरी व व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात यश संपादन करताना दिसते . गावाजवळ शिक्षणाच्या सोई सुविधांमुळे गावात सुशिक्षितांचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. परंपरागत व्यवसाय हा शेती असल्यामूळे आजही गावातील शेतकरी भात व भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.

सामाजिक परिस्थिती

संपादन

गावातील बहुतांश लोकसंख्या सुशिक्षित असल्याने येथील लोकांमधे आपआपसात एकतेची भावना आहे. गावात काही प्रमाणात वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. गावात ओंकार सेवा मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ आणि माउली कृपा ग्रुप अशी सामाजिक सेवा मंडळे आहेत.

रीतिरिवाज व परंपरा

संपादन

गावात आगरी समाजाचे लोक राहत असल्यामुळे येथील लोक, आगरी समाजाची ओळख असलेला लग्न समारंभ (हळदी समारंभ) मोठ्या उत्साहात साजरा करतात. गावाची ग्रामदेवता गांवदेवी माता पालखी सोहळा आणि हनुमान मंदिरात साजरा होणारा ७ दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. होळी, दिवाळी, दसरा, नवरात्र, गणेशोत्सव व शिवजयंती हे सणसुद्धा असेच उत्साहात साजरे होतात. साईबाबांचा पालखी सोहळा तसेच भातसई ते शिर्डी हा पदयात्रा सोहळा सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा होतो.

पर्यटन

संपादन

भातसई नदीच्या काठावर अनेक लोकांनी Farm Houses बांधली आहेत व त्यांचा वापर हा पर्यटकांच्या निवासासाठी केला जातो. त्यांमध्ये प्रामुख्याने BIG RED TENT, व ’सृष्टी फार्म’चा विशेष उल्लेख करता येईल. येथे मुंबई तसेच ठाण्याहून पर्यटक येतात आणि भातसईच्या मोकळ्या हवेत व निसर्गरम्य वातावरणात आपल्या Weekendची तसेच Holydaysची मजा लुटतात.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate