ब्रुनेईचा ध्वज २९ सप्टेंबर १९५९ रोजी स्वीकारला गेला. ध्वजातील पिवळा रंग ब्रुनेईचा सुलतान दर्शवितो (आग्नेय आशियात पिवळा रंग शाही रंग मानला जातो).
या ध्वजातील चंद्रकोर ब्रुनेईचा प्रमुख धर्म इस्लाम दर्शविते. या चंद्रकोरीवर असलेले छत्र ब्रुनेईतील राजेशाही दर्शविते. चंद्रकोरीखाली असणाऱ्या फीतेवर आणि चंद्रकोरीवर अरबी अक्षरांत "ब्रुनेईचे सुलतान, शांतीचे निवासस्थान" आणि "नेहमीच देवाच्या मार्गदर्शनाच्या सेवेत" असे लिहिले आहे.

ब्रुनेईचा ध्वज
ब्रुनेईचा ध्वज
ब्रुनेईचा ध्वज
नाव ब्रुनेईचा ध्वज
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार १:२
स्वीकार २९ सप्टेंबर १९५९

हे सुद्धा पहा संपादन