ब्रह्मानंदम

भारतीय अभिनेते

केनेट्टगी ब्रह्मानंदम तथा ब्रह्मानंदम हे एक भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी आंध्र प्रदेशमधील एका गावात झाला. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेलुगू सिनेमामधून केली. त्यांनी जगात सर्वाधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत १००० हून जास्त चित्रपटामध्ये काम केल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावावर विक्रम आहे.[१] त्यांनी हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना २००९ साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले..[२]

ब्रह्मानंदम
ब्रह्मानंदम
जन्म केनेट्टगी ब्रह्मानंदम
१ फेब्रुवारी, १९५६ (1956-02-01) (वय: ६८)
सेत्तांपल्ली,गुंटूर,आंध्रप्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ ते आजपर्यंत
भाषा तेलुगूआणि तमिळ
पुरस्कार पद्मश्री २००९
पत्नी लक्ष्मी अतापली
अपत्ये राजा गौतम आणि सिद्धार्थ
धर्म हिंदू
behamnandam

जीवन संपादन

ब्रह्मानंदम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी सेत्तमपल्ली, गुंटूर, आंध्रप्रदेश येथे झाला. त्यांनी १९८६ साली लक्ष्मी अटपाली यांच्या सोबत लग्न झाले. त्यांना २ मुले आहेत ते म्हणजे राजा गौतम आणि सिद्धार्थ. ते २०१७ साली त्यांच्या पुत्राला अपत्य झाले तेव्हा ते आजोबा बनले. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे योग्यरीत्या पूर्ण झाली.[३]

व्यवसाय संपादन

ते अभिनेत्याच्या व्यवसाया सोबतच ते तेलगू भाषेचे लेक्चर आहेत.त्यांनी आपले पदार्पण जन्ध्याला या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Most screen credits for a living actor more than 950". guinnessworldrecords.com. Archived from the original on 17 जानेवारी 2012. 27 फेब्रुवारी 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "The Hindu : Front Page : List of Padma awardees 2009". Chennai, India: hindu.com. 26 जानेवारी 2009. Archived from the original on 5 नोव्हेंबर 2012. 27 फेब्रुवारी 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "साउथ की हर दूसरी फिल्म में दिखने वाला ये कॉमेडियन अस्पताल में भर्ती, इस बीमारी से जूझ रहे" (हिंदी भाषेत). २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.