नारद मुनी

(ब्रम्हर्षी या पानावरून पुनर्निर्देशित)

सनातन

नारद

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.

नारद जयंती वैशाख कृष्ण प्रतिपदेला (किंवा, काहींच्या मते द्वितीयेला) असते.

'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाति सः नारदः') त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोकपाताळलोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तनकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.[]

नारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर केयूर व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतीचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. .[]

नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.[ संदर्भ हवा ]पण या कळी लावण्यामध्येसुद्धा जगाचे हित असते

नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये व सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात.

नारदांविषयीची मराठी पुस्तके

संपादन
  • नारदपुराण (मूळ संस्कृत)
  • नारद भक्तिसूत्रे (महादेव विनायक गोखले)
  • नारद भक्तिसूत्रे आणि त्यातील भक्तिविचार (शिवाजी भावे)
  • नारद-लोकसंज्ञापक ब्रह्ममानसपुत्र : भक्तियोगाचे उद्गाते (नारदांच्या जीवनावर आधारित कादंबरी, लेखक - अनिल सहस्रबुद्धे)
  • विदुर नीती, नारद नीती, कणिक नीती, यक्षप्रश्न (ह.अ. भावे)





संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b डॉ. रमा गोळवलकर. तरुण भारत, आसमंत पुरवणी, पान ७ "प्रतिकांच्या देशा - नारद" Check |दुवा= value (सहाय्य). २६-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]